एक्स्प्लोर

70 लाखांचं बजेट अन् कमावले 7 कोटी, अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट, 50 आठवडे थिअटर होते हाऊसफुल

Amitabh Bachchan big blockbuster : 70 लाखांचं बजेट अन् कमावले 7 कोटी, अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट, 50 आठवडे थिअटर होते हाऊसफुल

Amitabh Bachchan big blockbuster : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून आहेत. आज आपण त्यांच्या अशाच एका दशकांपूर्वीच्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने लाखो रुपयांच्या बजेटमध्ये कोट्यवधींची कमाई करत त्या काळात बॉक्स ऑफिसला हादरवून सोडलं होतं. विशेष म्हणजे आजही या चित्रपटाची लोकप्रियता तशीच टिकून आहे. चला तर जाणून घेऊया त्या चित्रपटाबद्दल.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1969 साली 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यापैकी काही हिट ठरले, तर काही सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर झाले. आपल्या 56 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बिग बी यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि नायकापासून खलनायकापर्यंतची भूमिका निभावली आहे. त्यांच्या 'शोले', 'दीवार', 'जंजीर', 'पा' आणि 'पिंक' यांसारख्या चित्रपटांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. पण आज आपण त्यांच्या सर्वात जुन्या आणि सुपरहिट चित्रपटांपैकी एका चित्रपटाची माहिती पाहणार आहोत.

हा चित्रपट म्हणजे 1978 साली प्रदर्शित झालेला 'डॉन'. हा चित्रपट आजही एक उत्कृष्ट अ‍ॅक्शन थ्रिलर मानला जातो. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केलं होतं आणि याची कथा प्रसिद्ध लेखकद्वय सलीम-जावेद यांनी लिहिली होती. चित्रपटाचे निर्माते नरीमन ईरानी होते. या चित्रपटाने दमदार कथा, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अमिताभ बच्चन यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. हा चित्रपट आपल्या स्टायलिश सादरीकरणासाठी, उत्कंठावर्धक कथानकासाठी आणि संस्मरणीय संवादांसाठी आजही लोकप्रिय आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल म्हणजेच 'डॉन' आणि 'विजय' अशी दोन पात्रं साकारली होती. त्यांच्यासोबत चित्रपटात जीनत अमान (रोमा), प्राण (जसजीत), इफ्तेखार (डीएसपी डी'सिल्वा), ओम शिवपुरी (वर्धन) आणि सत्येन कप्पू (इन्स्पेक्टर वर्मा) यांनी आपल्या भूमिका ताकदीने साकारल्या होत्या. याशिवाय हेलेन (कामिनी) आणि मॅक मोहन (मॅक) हे कलाकारही चित्रपटाचा भाग होते. या सर्व कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे चित्रपट सुपरहिट ठरला. अमिताभ बच्चन यांचा "डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है" हा संवाद आजही लोकांच्या ओठांवर आहे.

या चित्रपटाने त्या काळात अनेक विक्रम मोडले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. चित्रपटाचा बजेट सुमारे 7 लाख रुपये होता, पण त्याने जवळपास 7 कोटी रुपयांची कमाई करत मोठी यशोशिखरं गाठली. हा चित्रपट 1978 मधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि गोल्डन जुबली हिट ठरला. या चित्रपटाची लोकप्रियता इतकी वाढली की याचे अनेक रिमेक्स आणि सिक्वेल्सही बनले, ज्यामध्ये 2006 साली आलेला शाहरुख खानचा 'डॉन' देखील सामील आहे. 'खइके पान बनारस वाला' आणि 'ये मेरा दिल' ही गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.

चित्रपटाची कथा एका डेंजरस असलेल्या गुन्हेगार डॉनवर आधारित आहे, ज्याला पोलिस पकडण्याचा प्रयत्न करत असतात.  डॉन मारला जातो, पण डीएसपी डी'सिल्वा ही बातमी लपवतो आणि डॉनसारखाच दिसणारा विजय या पोलिस मिशनसाठी तयार करतो. विजयला डॉनच्या टोळीत घुसवून गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी दिली जाते. चित्रपटात अनेक थरारक वळणं येतात, जी प्रेक्षकाला खिळवून ठेवतात. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. IMDb वर या सिनेमाला 7.7/10 रेटिंग मिळाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sunil Dutt and Nargis Dutt : नर्गिसचं निधन होताच सुनील दत्त यांनी एकटेपणाला कवटाळलं, नैराश्यात गेले; पहाटे 3 वाजता स्मशानभूमीत जायचे अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget