एक्स्प्लोर

‘चिराग सेटवर जेवत नाही’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्याने शिकवला धडा! ‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरचा धमाल किस्सा...

Chirag Patil : ‘मराठी पाऊल पडते पुढे’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता चिराग पाटील याने त्याच्या एका गोष्टीने संपूर्ण क्रूच्या जेवणाची सवयच बदलून टाकली.

Chirag Patil : चित्रपटाची शूटिंग म्हटलं की, मोठमोठाले सेट, लाईट्स, आणि अवजड उपकरणे...! या सर्वांची उठाठेव करणे म्हणजे खूप मोठी अंगमेहनत! परिणामी सेटवर शारीरिक ताकद मिळण्यासाठी सर्वांसाठी आवडत्या पोटभर जेवणाची नेहमीच व्यवस्था असते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मात्र हे चित्र थोडे वेगळे होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता चिराग पाटील (Chirag Patil) याने त्याच्या एका गोष्टीने संपूर्ण क्रूच्या जेवणाची सवयच बदलून टाकली.

‘मराठी पाऊल पडते पुढे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी चिराग आवर्जून घरचा डबा आणायचा. हे रोजचं होऊ लागल्या कारणाने सेट वरील लोकांना या गोष्टीचे नवल वाटले, तर कालांतराने सेटवर चिराग सेटवरचं जेवण जेवत नाही, या चर्चा रंगू लागल्या. या चर्चा जेव्हा खुद्द चिरागच्या कानावर पडल्या तेव्हा त्याने एक शक्कल लढवायची ठरवली. सेटवर जेवण्याची सर्व्हिस देणाऱ्या केटरर्सला त्याने स्वतः भेटून पुढील तब्बल 5 दिवस खाण्याचा सोडा, नॉन व्हेज, फूड कलर या गोष्टींशिवाय जेवण बनवायला सांगितले.

नॉनव्हेज अन् सोडायुक्त खाणं केलं बंद!

आता खुद्द सिनेमाचा नायकचं आपल्याला सांगतो, तर आपल्याला हे ऐकावंच लागेल असा विचार करत केटरर्सनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवसापासून हेल्दी जेवण सेटवर यायला लागलं. सुरुवातीला लोकांनी जेवणावर नाकं मुरडली. पण, दुसऱ्या तिसऱ्या दिवसांपासून सर्वांनीच शाकाहारी जेवण आनंदाने खाण्यास सुरुवात केली. काही मंडळींनी चिरागने असं का केलं असावं, याचा पाठपुरावा करण्यासाठी थेट त्यालाच प्रश्न केला असता त्याने स्मितहास्य करत सांगितले, सेटवरच्या जेवणाला माझा कधीच विरोध नाही, पण कधी कधी जास्त क्वांटिटी असलेल्या जेवणात खाण्याचा सोडा मिसळला जातो. आता त्याचे परिणाम दिसत जरी नसले, तरी त्याचे परिणाम आपल्या उतरत्या वयात नक्कीच दिसतात. त्यामुळे खाण्याचा सोडा न खाल्लेला बरा. शिवाय नॉन व्हेजचे अतिसेवन देखील त्रासदायक असते.

शाळेत असल्यापासून आईने बनवलेल्या घरच्या डब्याची माझी सवय कधीच सुटली नाही हे ही तितकंच खरं! म्हणून मी घरच्या पौष्टिक अन्नाला प्राधान्य देत आलेलो आहे  आणि म्हणून मी जिथेही जातो तिथे माझ्यासोबत माझ्या घरचा डब्बा सोबतच असतो. कधी घरापासून लांब जास्त दिवसांच्या शूटिंगचा प्लॅन असेल तर आईने शिकवलेले बेसिक कुकिंग त्यावेळी कामी येते. त्यामुळे बाहेरचं किंवा सेटवरचं जेवण खाणं मी शक्यतो टाळतो. माझ्या सोबत काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मला आदर आहे शिवाय त्यांच्या तब्येतीचादेखील मी विचार करतो. असं केल्याने जर मी त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारत असतील, तर माझ्या मते मी चांगलंच केलं असं वाटतंय.

‘मराठी पाऊल पडते पुढे’मध्ये दिसणार मुख्य भूमिकेत!

5 दिवसांच्या या पचन क्रियेला कमी ताण देणाऱ्या जेवणाने फ्रेशनेस वाढल्याच्या प्रतिक्रिया सेटवर नंतर ऐकायला मिळाल्या. चिराग पाटीलचा आगामी मराठी चित्रपट ‘मराठी पाऊल पडते पुढे’मध्ये तो एक निर्भीड उद्योजकाची भूमिका साकारत आहे. मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून, चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. तसेच, चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे आपल्याला चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे या चित्रपटात खलभूमिका निभावत आहेत, अभिनेता संजय कुलकर्णी आणि अभिनेता सतीश सलागरे यांचीदेखील उल्लेखनीय भूमिका आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget