Pravin Tarde : फक्त 50 दिवस राहिले म्हणत प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर
Pravin Tarde : प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
Pravin Tarde : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव'(Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं प्रविण तरडेंनी फक्त 50 दिवस राहिले म्हणत 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा 27 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट असे म्हणत 'सरसेनापती हंबीरराव'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. या सिनेमात प्रविण तरडे स्वत: 'सरसेनापती हंबीरराव'चे पात्र साकारणार आहेत. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या
Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास
Raigadala Jevha Jaag Yete : 'रायगडाला जेव्हा जाग येते’आता नव्या संचात; शुभारंभाचा प्रयोग रायगडावर
Rang Majha Vegla : दीपिका-कार्तिकी मिळून आई-बाबांचा शोध घेणार! बहिणी असल्याचं सत्य अखेर समोर येणार?