(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन
प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे आज (7 एप्रिल) मुंबई येथे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली होती. त्यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माया गोविंद यांचे निधन आज सकाळी 9.30 वाजता जुहू येथील त्यांच्या घरी झाले. त्यांनी सांगितले, 'गेल्या चार महिन्यामध्ये दोन वेळा माया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू केले.'
तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन
गान कोकिळा अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत तब्बल 25 वर्षे काम करणारे कल्याण मधील सुप्रसिद्ध तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे 56 वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने काल रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य - ओंकार ही दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
अभिनेत्री आसावरी जोशींचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 'कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोवडण्याचा प्रयत्न करणार', असं त्यांनी यावेळी सांगितलं.
'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे 'हे' आहेत टॉप पाच स्पर्धक
'इंडियन आयडॉल मराठी'तया कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता या टॉप पाच स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.जगदिश चव्हान, भाग्यश्री टिकले, प्रतिक सोळसे, श्र्वेता दांडेकर आणि सागर म्हात्रे हे 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक आहेत.
प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर
प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं प्रविण तरडेंनी फक्त 50 दिवस राहिले म्हणत 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
संबंधित बातम्या