Aashram 3 : ओटीटीवर दिसली ‘बाबा निराला’ची जादू, अवघ्या दोन दिवसांत पार केले 100 मिलियन व्ह्यूज!
Aashram 3 : आश्रमाच्या पहिल्या दोन सीझनला जवळपास 160 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्या तुलनेत तिसर्या सीझनने प्रचंड प्रचंड मोठी झेप घेतली आहे.
Aashram 3 : एमएक्स प्लेयरच्या 'एक बदनाम-आश्रम' (Aashram 3) या वेब सीरीजचा तिसरा सीझन चांगलाच पसंत केला जात आहे. प्रेक्षकही ही सीरीज मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. आत बॉबी देओलच्या (Bobby Deol) ‘आश्रम 3’ने एक मोठा विक्रम केला आहे. बॉबी देओल स्टारर या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनने ओटीटीच्या जगात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सीरीजचा तिसरा सीझन रिलीज होताच काही तासांतच व्ह्यूजचा विक्रम केला. ‘एक बदनाम-आश्रम 3’ला अवघ्या 32 तासांत 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
आश्रमाच्या पहिल्या दोन सीझनला जवळपास 160 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्या तुलनेत तिसर्या सीझनने प्रचंड प्रचंड मोठी झेप घेतली आहे. सीझन 3चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या वेब सीरीजची चर्चा होतीच. मात्र, रिलीजच्या सहा तासांत हा शो संपूर्ण भारतातील YouTube वर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. ‘आश्रम’ वेब सीरीजचा तिसरा सीझन 3 जून रोजी प्रसारित झाला आहे.
काय आहे कथानक?
‘आश्रम’ हा असाच एक शो आहे, जो ‘बाबा निराला’ यांच्या जीवनाचे चित्रण करतो. ‘एक बदनाम-आश्रम 3’मध्ये, ‘काशीपूर वाले निराला बाबा’ आता अधिक विक्षिप्त आणि निर्भय झाले आहेत. सत्तेच्या लालसेने त्यांना अजिंक्य बनवले आहे. ते स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतात. हा बाबा आश्रमाची सत्ता मिळविण्यासाठी महिलांचे शोषण, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर कामे करत आहे.
बॉबी देओलला मिळाली नवी ओळख!
या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. ‘निराला बाबा’च्या व्यक्तिरेखेतून त्याला एक नवी ओळख मिळाली आहे. त्याची ही भूमिका लोकांना खूप आवडते आहे. सीरीजच्या दोन सीझननंतर आता तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘आश्रम 3’ने भारतात OTT वर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मालिकेचा किताब पटकावला आहे. या सीरीजमध्ये बॉबी देओलने अभिनेत्री त्रिधा चौधरीसोबतही अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. बॉबी देओलसोबत या सीरीजमध्ये, अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा :