एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बेलापूर विधानसभा मतदारसंघ : विजयी कोण होईल यापेक्षा उमेदवारी कुणाला मिळणार याचीच उत्सुकता!

बेलापूरमध्ये नाईकांच्या भाजपप्रवेशाने अनेक प्रश्न शिवसेना भाजपसमोर उभे राहिलेत. 2014 च्या विधानसभेत गणेश नाईकांचा पराभव केलेल्या मंदा म्हात्रे या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच, आता नाईकही राष्ट्रवादीत येऊ घातल्याने मंदा म्हात्रेची अडचण झालीय. शिवसेनाही बेलापूरसाठी उत्सुक आहे. त्यामुळे जिंकणार कोण यापेक्षा उमेदवारी कोणाला हा इथला मिलियन डॉलर प्रश्न आहे

राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असलेल्या गणेश नाईक यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशामुळे बेलापूर मतदार संघातील निवडणुकीचं चित्रच पालटलं आहे. गणेश नाईक यांचे चिरंजीव ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. गणेश नाईकही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याने बेलापूर मतदार संघात भाजपाची उमेदवारी विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांना मिळणार की गणेश नाईक यांना यावर खलबते सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना - भाजपाची युती झाल्यास हा मतदार संघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने झोपडपट्टी पुनवर्सन मंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बेलापूर मतदार संघ जिंकणार कोण यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळणार याचीच चर्चा सध्या रंगली आहे. इतिहास आणि सद्यस्थिती 2014 च्या विधानसभा निडवणुकीत बेलापूर मतदार संघात गणेश नाईक यांचा भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. त्या राज्यातील जायंट किलर ठरल्या होत्या. नवी मुंबई-ठाण्यातील खासदारकी, दोन आमदारक्या, महानगरपालिका महापौर अशी सगळीच पदे आपल्या घरात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या विजयी घौडदोडीला ब्रेक लागला तो २०१४ लोकसभेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी संजीव गणेश नाईक यांचा पराभव करुन पुन्हा एकदा ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा धक्कादायक पराभव केला.
गेली 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता ठेवणाऱ्या गणेश नाईक यांना 2015 च्या मनपा निवडणूकीत एकहाती आणण्यात अपयश आलं. काँग्रेसच्या कुबड्यांचा सहारा घेत त्यांना पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा लागला. त्यामुळे बदलेली राजकीय परिस्थिती म्हणा किंवा अपपरिहार्यता म्हणा गणेश नाईकांना शरद पवार यांची साथ सोडत भाजपाचे कमळ हाती घ्यावे लागलं आहे. गणेश नाईक यांनी अजून भाजपात प्रवेश केला नसला तरी त्यांचे चिरंजीव ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करीत नाईकांची पावलं भाजपाच्या दिशेने असल्याचं दाखवून दिलं आहे. गणेश नाईक यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशामुळे बेलापूर मतदार संघाची भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांना मिळणार की गणेश नाईक यांना यावरून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच संभ्रमात आहेत. गणेश नाईक यांच्याकडे नगरसेवकांची फौज असल्याने पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याच्या स्वप्न ते पूर्ण करू शकतात. त्यामुळे गणेश नाईक यांच्या नावाला भाजपा पसंती देवू शकते. दुसरीकडे येथील भाजपाच्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत पाच वर्ष लोकांच्या संपर्कात राहून येथील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असल्याने त्यांचं तिकीट कापणं पक्षासाठी अवघड आहे.
हे ही वाचा : ऐरोली मतदार संघ : खरी चुरस युतीमध्येच, आ. संदीप नाईक यांच्या भाजपप्रवेशाने राष्ट्रवादी अस्तित्वहीन मात्र शिवसेना- भाजपा युती झाल्यास नवी मुंबईतील दोन मतदार संघापैकी बेलापूर मतदार संघ शिवसेनेला सुटू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून शिवसेनेचे उपनेते आणि झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. नाहटा यांनी सामाजिक उपक्रमाचा धडाका लावत बेलापूर मतदार संघ शिवसेनेलाच सुटणार असून आपणच उमेदवार असल्याचं छातीडोकपणे सांगायला सुरुवात केलीय. नाईकांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व सध्या धोक्यात आलं आहे. तर काँग्रेसचीही ताकद दखल घेण्यासारखी नसल्याने बेलापूर विधानसभेत खरी लढाई विजयासाठी नसून भाजप-शिवसेना नेत्यांच्या उमेदवारीसाठीच होणार आहे. शिवसेना-भाजपा युती झाल्यास.. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेत भाजपाकडून मंदाताई म्हाञे आणि ऐरोली विधानसभेत ऱाष्ट्रवादीकडून संदीप नाईक विजयी झाले होते. संदीप नाईक यांनी सध्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही विधानसभा भाजपा स्वतःला मागेल. मात्र याला शिवसेना राजी होणार नाही. नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे 38 नगरसेवक आहेत. विधानसभेनंतर लगेच पाच महिन्यांनी महानगरपालिका निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही आमदारकी भाजपाकडे गेल्यास याचा मोठा फटका महानगरपालिकेत शिवसेनेला बसू शकतो. हे लक्षात घेवून शिवसेना विजय नाहटांसाठी बेलापूर विधानसभा मागून घेईल. मंदाताई म्हात्रे की गणेश नाईक दोघांपैकी कोणाला तिकिट द्यायचे या पेचातून सुटण्यासाठी भाजप शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देईल. भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण.. बेलापूर विधानसभा हा काॉस्मोपाॉलिटीन आणि उचभ्रू वस्तीचा आहे. महानगरपालिकेचे येथून 55 नगरसेवक निवडून जातात. वाशी, सानपाडा, पामबीच रोड, नेरूळ, सीबीडी हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोकांचा भाग आहे. तर तुर्भे हा अत्यल्प उत्पन्न गट आणि झोपडपट्टी बहूल विभाग आहे. मराठी माणसांबरोबर इतर राज्यातील मतदारसंख्या चांगली असल्याने याचा प्रभाव मतदानावर पडल्याचं 2014 निवडणुकीत दिसून आलं.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ नवी मुंबईतीलच असल्याने या दोन्ही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. त्यामध्ये नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे नियमीत करून त्यांना प्राॉपर्टीकार्डाचं वाटप करणं. सिडकोच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला मनपाची बांधकाम परवानगी मिळवणं तसंच सीबीडीतील मरिना प्रकल्पाला मंजूरी मिळूनही कार्यान्वित न झालेल्या प्रकल्पाला गती मिळवून देणं आणि झोपडपट्टी वासियांच्या घराचं एसआरए अंतर्गत बांधकाम मतदार संघातील मार्गी लागलेले प्रश्न आहेत.
1)      सिडकोच्या इमारती फ्रीहोल्ड झाल्या. लीज डिड मध्ये वाढ 2)      ऐतिहासिक बेलापूर किल्याची डागडुजी, सुशोभीकरणाला सुरवात 3)      सिडको घरांच्या पुनर्बांधणीसाठी 51 टक्के सदस्यांची सहमती 4)      खाडीकिनारी मच्छीमारांसाठी जेटींची उभारणी2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल..मंदाताई म्हात्रे - भाजप - (विजयी) 55316 गणेश नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस - 53816 विजय नाहटा - शिवसेना -         50983 संभाव्य उमेदवार 2019 भाजप - गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रामचंद्र घरत शिवसेना - विजय नाहटा, विठ्ठल मोरे, नामदेव भगत काँग्रेस - दशरत भगत, अनिल कौशिक, संतोष शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस - अशोक गावडे, सुरेश कुलकर्णी मनसे - गजानन काळे. वंचित आघाडी - विरेंद्र लगाडे,  मल्लिकार्जून पुजारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवालMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaRohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Embed widget