UP Elections 2022 : यूपीमध्ये पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, अमित शाह, राहुल गांधीसह दिग्गजांच्या जाहीर सभा
उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. मतदानाचा पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
UP Elections 2022 : निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. मतदानाचा पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात 61 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या जाहीर सभा होणार आहेत.
आज सायंकाळी सहा वाजता पाचव्या टप्प्यासाठी सुरू असलेला प्रचार थांबणार आहे. त्यासाठी आज सहा वाजेपर्यंत दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अकिलेश यादव या नेत्यांच्या आज सभा होणार आहेत. त्यामुले उत्तर प्रदेशमदील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही आजपासून यूपी दौरा सुरू होत आहे. राहुल आज अमेठी, प्रयागराजमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता राहुल अमेठीच्या थौरी विधानसभेत जाहीर घेणार आहेत. त्याचवेळी दुपारी 2.40 च्या सुमारास ते विश्रगंज बाजार विधानसभेत जाहीर सभा घेण्यासाठी पोहोचतील. याशिवाय दुपारी साडेचारच्या सुमारास प्रयागराजमधील कोरोन येथे ते जनतेला संबोधित करणार आहेत.
अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते आज आंबेडकर नगर, प्रयागराज, कौशांबी आणि प्रतापगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शाह सकाळी 11.40 वाजता जयराम जनता ज्युनिअर हायस्कूल, आलापूर, आंबेडकर नगर येथे जाहीर सभा घेणार आहेत. यानंतर श्री अरविंद घोष दुपारी 1:25 वाजता इंटरमीडिएट कॉलेज ग्राउंड, हरिसेनगंज, मौइमा, सोराव, प्रयागराज येथे जाहीर सभा घेणार आहेत. तर दुपारी 02.45 वाजता कौशांबीच्या सिरथू विधानसभेत मेळावा होणार आहे. त्यानंतर 4 वाजता प्रतापगडच्या रामपूरखास विधानसभेसाठी रामपूर बाओली चौरस्त्यावर अमित शाह यांची सभा होणार आहे.
अखिलेश यादव
समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज बहराइच आणि अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11:45 वाजता अयोध्येच्या मिल्कीपूरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुपारी 12:30 वाजता गोसाईगंज विधानसभेच्या लालगंजमध्ये अभय सिंह यांच्यासाठी जाहीर सभा होईल. दुपारी दीड वाजता अयोध्या धाममध्ये अखिलेश रोड शो करणार आहेत. अयोध्या धाममधील राम कथा पार्क ते फैजाबाद शहरातील गांधी पार्कपर्यंत रोड शो होणार आहे. सुमारे 8 किमीचा रोड शो होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सुलतानपूर, चित्रकूटसह प्रयागराजमध्ये जाहीर गेणार आहेत. योगी आदित्यनाथ सकाळी 10.50 च्या सुमारास अयोध्येहून सुलतानपूरला रवाना होतील. योगी सुलतानपूरमधील कटरा खानपूर येथे जाहीर घेणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता कटरा खानपूर, सुलतानपूर येथे सभा होणार आहे. यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस लाईनसमोर ते चित्रकूट येथे सभा घेतील. तसेच दुपारी 2:45 च्या सुमारास, फुतावा तारा मुख्यालयाजवळ, करचना, प्रयागराजमध्येही जाहीर सभा घेणार आहेत. 3:45 च्या सुमारास श्री वीरेंद्र बहादूर सिंह भूमी, सरायनमम रेंज, प्रयागराज येथे एका जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लोकनाथ चौरस्त्यावर प्रयागराज येथे सायंकाळी 5:15 वाजता जाहीर होणार आहे.
प्रियंका गांधी
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशमधील काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ अमेठी आणि प्रतापगडमधील निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता जगदीशपूर अमेठीमध्ये राहुल गांधींसोबत भाषण होईल, त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्या इंदिरा चौक, रामपूर खास येथे जाहीर सभेला संबोधित करतील. त्याच वेळी, महिंद्रा कोल्ड स्टोअर ग्राउंड, सलून, अमेठी येथे दुपारी 4.30 वाजता जाहीर सभेला संबोधित करपणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- यूपीचे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार; योगींच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गर्जना
- Ukraine Russia Crisis: युक्रेन-रशिया तणावाच्या परिस्थितीवर नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले...