एक्स्प्लोर
Advertisement
'देशपांडे-कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत', ब्राह्मण समाजाचं मन दुखावल्याबद्दल राजू शेट्टींचा माफीनामा
'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांडे यांची नाही. मात्र ते इतरांना देशभक्ती शिकवतात' असं वक्तव्य राजू शेट्टींनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
कोल्हापूर : 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'चे खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. कोल्हापुरातील सभेत बोलताना राजू शेट्टींनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजात रोष होता.
'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांडे यांची नाही. मात्र ते इतरांना देशभक्ती शिकवतात' असं वक्तव्य शेट्टींनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
शहीदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं. मात्र ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली.
राजू शेट्टींविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र शेट्टींच्या माफीनाम्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
'स्वाभिमानी शेतकरी संघटने'कडून हातकणंगलेच्या जागेवर महाआघाडीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरलेमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. हातकणंगलेतून शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टींविरोधात रिंगणात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement