एक्स्प्लोर
अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींनी घातलेलं जॅकेट कोणी भेट दिलं?
सोलापुरातील अकलूजमध्ये आयोजित सभेत मोदींनी घातलेलं जॅकेट सोलापुरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक आणि टेलर किरण येज्जा यांनी भेट दिलं होतं.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. अकलूजमधील प्रचारसभेत मोदींनी घातलेलं जॅकेट सोलापुरातील कापड व्यावसायिकाने तयार केल्याची माहिती आहे. बी. वाय. टेलर्सच्या किरण येज्जा यांनी हे जॅकेट डिझाईन केलं होतं.
नरेंद्र मोदींचे पेहराव कोण डिझाईन करतं, याविषयी सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. मोदींचे कपडे बहुतांश वेळा त्यांच्या चाहत्यांकडून भेट दिले जातात, विशेषतः जॅकेट. सोलापुरातील अकलूजमध्ये आयोजित सभेत मोदींनी घातलेलं जॅकेट सोलापुरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक आणि टेलर किरण येज्जा यांनी भेट दिलं होतं.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी हे जॅकेट मोदींना दिलं. विशेष म्हणजे किरण येज्जा यांनी तिसऱ्यांदा मोदींसाठी खास जॅकेट पाठवलं आहे.
गेल्या वर्षी केदारनाथमध्ये झालेल्या सभेतही मोदींनी येज्जा यांनी भेट दिलेलं जॅकेट परिधान केलं होतं. त्यावेळी मोदींनी ग्रे लाईनिंगचं जॅकेट घातलं होतं. हे जॅकेट मोदींना कुरिअरने पाठवण्यात आलं होतं. केदारनाथमधील सभेसाठी जॅकेट भेट दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून येज्जा यांना आभाराचं पत्रही मिळालं होतं.
किरण येज्जा यांच्याकडे टेरी उल कापडाची मोनोपॉली आहे. या कापडाची किंमत चार हजार प्रतिमीटर असून शिलाईसह जॅकेटचा एकूण खर्च 15 हजारांच्या घरात जातो.
नोव्हेंबर 2018 मध्ये केदारनाथमधील सभेतील नरेंद्र मोदींचा फोटो
UNCUT| विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणं माझं भाग्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण | सोलापूर | एबीपी माझा
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement