एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : कालीचरण महाराजांनी मराठा योद्ध्याला 'राक्षस' म्हटल्याने वातावरण तापलं, आता संजय शिरसाट म्हणतात, 'मनोज जरांगे माझे मित्र'

Sanjay Shirsat : कालीचरण महाराज मनोज जरागेंना 'राक्षस' म्हटल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेट घेतलीय.

छत्रपती संभाजीनगरजरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि माझे संबंध स्नेहपुर्ण आहे. आजचा वेळ मी त्यांच्या भेटीसाठी दिलेला होता. राजकारण व्यतिरिक्तही काही विषय असतात. मित्र म्हणून मी भेटून मनोज जरांगे यांची विचारपूस करत असतो. अशी प्रतिक्रिया  यांच्याछत्रपती संभाजीनगरचे शिंदे गटाचे उमेदवार आणि शिंदे गटाचे  प्रवक्ते  संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील भेटीनंतर  संजय शिरसाट यांनी हे भाष्य केलं आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले. कालीचरण महाराज मनोज जरागेंना 'राक्षस' म्हटल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान त्याचा फटका उद्या होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मनोज जरांगे आणि  संजय शिरसाट यांच्या भेटी ला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. अशातच ही राजकीय भेट नसल्याचे  संजय शिरसाट म्हणाले असले तरी कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याची किनार या भेटीला असल्याचे बोलले जात आहे.  

अंबादास दानवे यांना पराभव दिसत असल्याने आरोप   

छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सदर व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं आलं समोर आलं आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांना त्यांचा पराभव दिसत आहे, त्यांना माहित आहे आपला पराभव होणार आहे, म्हणून ते असे आरोप करत असल्याचे  शिरसाठ म्हणाले.  

मी पैसे पाठवलेत की यांनी पैसे पाठवले, याची चौकशी पोलीस करतील. त्यासाठी ट्विट करायची गरज काय? पोलिसांना त्यांचं काम करू द्या. जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. असेही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Embed widget