एक्स्प्लोर

Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस

Manoj Jarange Patil Vs Kalicharan Maharaj: मनोज जरांगे पाटील यांच्यावर कालीचरण महाराजांची जहरी टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये घणाघाती भाषण

छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज यांनी केली. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केले.

राजा कसा असला पाहिजे, हे लोकं निवडून देतात. पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण येणार, तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशी टीका कालीचरण महाराज यांनी केली.

आपण मतदानासाठी जात नाही. त्यामुळे मुस्लिमधर्जिणे लोक राजा बनू लागले आहेत. मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचं असे सर्वच राजकीय पक्ष वापरतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम (Muslim) असतात. पण ज्यांची कातडी सोलली जाते ते हिंदू आहेत, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले.

हिंदूंचं हित पाहणाऱ्यांनाच मतदान करा; कालीचरण महाराजांचं आवाहन

जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा.  जागो जागी पाकिस्तान बनला आहे, जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जादूटोणा करून रोज 40 हजार मुली पळवतात. 100 टक्के अहिंसा संभव नाही. हिंसा करावीच लागते, त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असेही कालीचरण महाराजांनी म्हटले.

आणखी वाचा

कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?

सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची
Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
Embed widget