एक्स्प्लोर
Advertisement
संबित पात्रा पराभूत, पिनाकी मिश्रा यांनी मात दिली, मोदींकडून बीजू जनता दलाचे अभिनंदन
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ओदिशा मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सभा आणि रोड शो देखील केला होता. मात्र हा रोड शो पुरीमधून संबित पात्रा यांना विजय मिळवून देऊ शकला नाही.
पुरी : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएने पुन्हा जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना मात दिली. पिनाकी मिश्रा यांनी संबित पात्रा यांचा 11714 मतांनी पराभव केला.
देशात भाजपचा बोलबाला असला तरी बीजू जनता दलाने ओदिशामध्ये जोरदार कामगिरी केली. नवीन पटनायक यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. ओदिशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक सोबत झाल्या. या निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाने चांगली कामगिरी केली आहे.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ओदिशा मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सभा आणि रोड शो देखील केला होता. मात्र हा रोड शो पुरीमधून संबित पात्रा यांना विजय मिळवून देऊ शकला नाही.
संबित पात्रा यांच्या विरोधात विद्यमान खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासह काँग्रेसचे सत्य प्रकाश नायक यांचे आव्हान होते. भाजपने निवडणुकांच्या घोषणांमध्ये पुरीला देशाची सांस्कृतिक राजधानी बनवू असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांचा फायदा झाला नाही.
भाजपचे प्रवक्ते असलेले संबित पात्रा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement