एक्स्प्लोर

महाआघाडी करुनही नेते कुत्रे-माजरांसारखे भांडतात, पूनम महाजनांचा घणाघात

काँग्रेसची सध्याची परिस्थिती 'धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का' या म्हणीप्रमाणे झाली आहे. कधी हत्तीला सायकल चालवताना पाहिलं आहे का, भाजप खासदार पूनम महाजनांची महाआघाडीवर टीका

नवसारी, गुजरात : विरोधक महाआघाडी करुनही कुत्र्या-मांजरासारखी भांडतात, असा घणाघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. काँग्रेसची सध्याची परिस्थिती 'धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का' या म्हणीप्रमाणे झाल्याचंही पूनम महाजन म्हणाल्या. सपा आणि बसपा म्हणजे कधी हत्तीला सायकल चालवताना पाहिलं आहे का, असा सवालही पूनम महाजनांनी उपस्थित केला आहे. पूनम महाजन गुजरातमधील नवसारीच्या दौऱ्यावर होत्या. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विविध पक्षांतील नेत्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. राजकीय विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी नेतेमंडळी सोडताना दिसत नाहीत. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्षा पूनम महाजन गुजरातमध्ये प्रचार सभा घेत आहेत. उत्तर गुजरातमध्ये मराठी भाषिक उमेदवार आणि मतदार असल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी पूनम महाजनांनी चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचं संमेलन भरताना कधी पाहिलं आहे का? तिथे भाड्यावर आणलेले लोक कधी काँग्रेसच्या तर कधी सपा-बसपाच्या मेळाव्यांना जाताना दिसतात, असा घणाघातही पूनम महाजनांनी केला. मोदींचे निकटवर्तीय खासदार सी आर पाटील पुन्हा एकदा मैदानात आहेत. मराठी माणूस असल्याने मी आज गुजरात राज्यात प्रचारासाठी आली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवण्याचं प्रमोद महाजन यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणं सुदैव आहे, अशी प्रतिक्रिया पूनम महाजनांनी दिली. गुजराती जनतेसमोर पूनम महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या आठवणींना उजाळा दिला. गुजराती जनता आणि प्रमोद महाजन यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. ते अनेक वेळा सिद्धही झालं आहे. आता त्यांची कन्या आपल्या मराठी शिलेदारांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Embed widget