एक्स्प्लोर
साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटिसा, पालघर पोलिसांचा प्रताप
निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारी स्वरूपातील गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींविरोधात ज्या फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात त्या नोटिसा या लोकांनाही दिल्या आहेत.
पालघर : पालघरमध्ये सध्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी सुरु आहे. या दरम्यान पालघर पोलिसांनी एक अनोखा प्रताप केला आहे. वसईतील प्रसिध्द साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश असलेल्या नोटीस पाठवल्या आहेत. या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून दखलपात्र किंवा अदखलपात्र अपराध घडण्याची शक्यता या नोटिशीत वर्तवली असून तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे.
पालघर पोलिसांच्या या प्रतापाबद्दल सर्व क्षेत्रातून पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. वसईतील हरित वसईचे प्रणेते आणि वसईचं हरितपण ठिकवण्यासाठी आंदोलन करणारे 78 वर्षीय मार्कुस डाबरे, ज्येष्ठ कवी सायमन मार्टीन, वसईचे माजी आमदार डॉमनिक गोन्सालवीस, वसईच्या सामाजिक चळवळीत कार्यकर्त्या डॉमणिका डाबरे यांनाही नोटीस मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारी स्वरूपातील गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींविरोधात ज्या फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात त्या नोटिसा या लोकांनाही दिल्या आहेत. याबाबत स्वतः मार्कुस डाबरे यांच्यासह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
पालघर पोलीस अंतर्गत वसई पोलिसांनी तालुक्यातील 804 जणांना तर वसई शहरातील 110 जणांना अशा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसा म्हणजे चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर कोणतही भाष्य करण्याच टाळलं आहे. मात्र नोटिसा मागे घेण्यात येईल असं सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement