Narayan Rane and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही काही करु शकले नाहीत; नारायण राणेंची बोचरी टीका
Narayan Rane and Uddhav Thackeray: महाराष्ट्रात 25 ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांनी घरी बसावे, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

Narayan Rane and Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election Results 2026) ठाकरे बंधूंची सत्ता का आली नाही, याचे कारण उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारा. मुंबईत दोन्ही भाऊ एकत्र येऊनही काहीच करु शकले नाहीत, अशी बोचरी टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते रविवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आपला महापौर झाला पाहिजे म्हणतात. देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल, असे त्यांनी म्हटले. पण उद्धव ठाकरे देवावर कधीपासून विसंबून राहायला लागले. आतापर्यंत त्यांनी कधी देवाकडे हात जोडले नाहीत. महापौर आकाशातून येईल का? त्यांची संख्या बघता एवढा फरक कसा भरुन निघणार? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हे पराभवामुळे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ते जे बोलत आहेत, ती वास्तव परिस्थिती नाही. महाराष्ट्रात 25 ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांनी घरी बसावे, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. आता नारायण राणे यांच्या टीकेवर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Narayan Rane on Zilla Parishad: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नारायण राणेंचं भाष्य
दरम्यान, नारायण राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित युती करणार आहोत. आम्ही एकमताने जागावाटप केले आहे. भाजप जिल्हा परिषदमध्ये 31 तर पंचायत समितीमध्ये 63 आणि शिवसेना जिल्हा परिषदेत 19 तर पंचायत समितीत 37 जागा लढणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या ते बसून ठरवू. महायुतीला या निवडणुकीतही 100 टक्के यश मिळेल. महानगरपालिकेचा निकाल लागला तसा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर असेल. वाद करायला महाराष्ट्रात विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत आमचे उमेदवार निश्चित होतील, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा




















