एक्स्प्लोर
Advertisement
केजमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, उमेदवार नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टमधून पवार आणि पक्षाचं चिन्हं गायब
एका विधानसभा मतदारसंघात असतानाही बजरंग सोनवणे यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनर्सवर कधी मुंदडांचा फोटो पाहायला मिळाले नाही तर तिकडे धनंजय मुंडे हे सुद्धा मुंदडांपासून दोन हात दूर राहतानाचं चित्र यापूर्वी अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळाले आहे.
बीड : मतदार आणि उमेदवार सोबत रहावे म्हणून शरद पवारांनी बीडमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली. पण ज्या उमेदवारांची घोषणा केली ते उमेदवारच आज राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर जात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय त्याचं कारण आहे केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार नमिता मुंदडा यांचे फेसबुक पोस्ट.
नमिता मुंदडा या आगामी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्या जनतेचा आशीर्वाद मागत आहेत. मात्र हे सांगत असताना आपला पक्ष कोणता? चिन्ह कोणते? अथवा नेता कोण हे मात्र सांगत नाहीयेत. त्यांच्या फेसबुक पोस्टवर कोणत्याही पक्षाचं नाव नाही. अथवा कोणत्याही पक्षाचं चिन्ह नाही. म्हणून नमिता मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दूर जात आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
म्हणूनच सत्तांतराचा मोठा धक्का सहन करणाऱ्या राष्ट्रवादीला समोर आता जाहीर केलेले उमेदवार सोडून जात असतील तर हा शरद पवारांना सर्वात मोठा धक्का समजला जातोय.
एका पक्षात राहून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंदडा गट कायम आपलं वेगळं अस्तित्व जपून होता. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मुंदडांसोबत कायम दुरावा होता. एका विधानसभा मतदारसंघात असतानाही बजरंग सोनवणे यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनर्सवर कधी मुंदडांचा फोटो पाहायला मिळाले नाही तर तिकडे धनंजय मुंडे हे सुद्धा मुंदडांपासून दोन हात दूर राहतानाचं चित्र यापूर्वी अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळाले आहे.
केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या मुंदडांना पक्षाच्या कामात मात्र कायम बाजूला सारले जायचे. म्हणूनच निवडणुका आल्या की राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते हे धनंजय मुंडे आणि अक्षय मुंदडा यांना तडजोडीसाठी एकत्र बसवत असत. तडजोडी करून बडे नेते जिल्ह्याबाहेर गेले ते पुन्हा जैसे थे परास्थिती पाहायला मिळायची.
एकीकडे भाजपाच्या केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांच्या उमेदवारीला भाजपमधला एक गट विरोध करतोय तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा या राष्ट्रवादीपासून दूर जात आहेत. त्यामुळे आगामी काळात केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या घडामोडी घडणार हे मात्र नक्की आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या दोन वर्षापासून जी गळती लागली आहे. ती मात्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. सुरुवातीला सुरेश धस त्यानंतर जयदत्त क्षीरसागर आणि आता अक्षय मुंदडा राष्ट्रवादीतून बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कधीकाळी राष्ट्रवादीचा गड असलेला बीड जिल्हा आता राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त सोडून गेलेल्या नेत्यांचा जिल्हा होणार का अशी परिस्थिती निर्माण होतेय का ? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement