एक्स्प्लोर
पालघरमध्ये मनसेचं इंजिन ओढणार बविआची रिक्षा
पालघरचे मनसे कार्यकर्ते उद्यापासून बविआचा प्रचार करणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी सांगितलं.
वसई : पालघरमध्ये 'बविआ'ची रिक्षा ओढण्यासाठी आता 'मनसे'चं इंजिन धावून आलं आहे. मनसेने पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजगडावर पालघरमधील कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब झालं. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबरोबर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची चर्चा झाली. राज ठाकरेंच्या आदेशाने जाधव यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
VIDEO | राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न : मनसे नेते अभिजीत पानसे | मुंबई | एबीपी माझा
पालघरचे मनसे कार्यकर्ते उद्यापासून बविआचा प्रचार करणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी सांगितलं.
पालघरची जागा महाआघाडीने 'बहुजन विकास आघाडी'ला सोडली आहे. 'बविआ'कडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या 'शिट्टी' या निवडणूक चिन्हावर बविआ निवडणूक लढवत आली आहे, तेही पक्षाच्या हातून निसटलं. अखेर रिक्षा या चिन्हावर बविआला रिंगणात उतरावं लागलं.
पालघरमधून शिवसेनेच्या तिकीटावर राजेंद्र गावित निवडणूक लढवणार आहेत. गेल्यावेळी पालघरमधील पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेल्या गावित यांनी यावेळी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधलं.
VIDEO | शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी आडकाठी करण्याचे प्रयत्न? | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement