एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: यह डर जरुरी है, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे महत्त्वाचं, लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation: मराठ्यांचा डर निर्माण झाला हे माझ्यासाठी महत्त्वाचं; जालना-बीडच्या निकालानंतर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना इशारा.

जालना: राज्यातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) मराठ्यांचा डर निर्माण झाला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण दिले नाही तर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करुन आम्ही त्यांचा कार्यक्रमच करु, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. आम्हाला निवडणुकीच्या विजयाच्या गुलालात रस नाही तर आम्हाला आरक्षणाचा गुलालच हवा असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ते बुधवारी अंतरवाली सराटीत 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. लोकसभा निवडणुकीत कोण निवडून आलं, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. राजकारण हा माझा किंवा माझ्या समाजाचा मार्ग नाही, हे मी आधीच बोललो होतो,  असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीत बजरंग सोनावणेंच्या भेटीबाबत जरांगे पाटील काय म्हणाले?

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी मंगळवारी रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. याबाबत विचारणा केली असता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, अंतरवाली सराटीत मला यापूर्वीही  सगळे भेटायला येत होते, आताही भेटायला येतात. त्यांना मला काही म्हणता येत नाही. कोणीही आल्यानंतर त्याला शुभेच्छा देणं, हे माझे कर्तव्य असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

बीड आणि जालन्याच्या निकालावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याशी शा‍ब्दिक वाद झाला होता. याचा फटका मुंडे आणि रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत बसल्याची चर्चा आहे. याबाबत विचारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मी राजकारणात नाही. मी लोकसभा निवडणुकीत कोणाला पाडा, असे म्हटले नाही. फक्त कोणाला पाडाल किंवा निवडाल, ते अशा पद्धतीने करा की, मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. मराठा समाजाने या निवडणुकीत त्यांची भूमिका दाखवून दिले, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

सरकारने माझ्या नादी लागू नये, हे मी आजही सांगतोय. माझ्यासोबत गोडीगुलाबीने वागा.  जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर विधानसभा निवडणुकीत मी 288 मतदारसंघात सगळ्या जातीधर्माचे उमेदवार उभे करुन सरकारचा कार्यक्रमच लावणार. या उमेदवारांमध्ये गोरगरीब, मुस्लीम, दलित, राजपूत, धनगर, लिंगायत आणि बारा बलुतेदार  अशा सगळ्यांचा समावेश असेल. गोरगरीबांच्या हातात मी सत्ता देईन. आता मी 8 जूनपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की, तुम्ही तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्या. आम्हाला आमचा हक्क देऊन टाका. आम्ही आता आणखी वाट पाहणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

बीडमध्ये मराठा फॅक्टरने सगळ्या समीकरणांचा पार चोळामोळा केला, विजयानंतर बजरंग बाप्पा रात्री अडीच वाजता मनोज जरांगेंच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget