(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Election Result 2024: बीडमध्ये मराठा फॅक्टरने सगळ्या समीकरणांचा पार चोळामोळा केला, विजयानंतर बजरंग बाप्पा रात्री अडीच वाजता मनोज जरांगेंच्या भेटीला
Maharashtra Politics: बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 32 फेऱ्या पार पडल्या. पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या फेऱ्यांमध्ये बजरंग सोनावणे यांनी मुसंडी मारली.
बीड: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात रोमहर्षक लढत ठरलेल्या बीड मतदारसंघात शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा तब्बल 7 हजारांनी पराभव केला. बीड लोकसभेचा निकाल (Beed Lok Sabha Result 2024) अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या बाजूने असलेले वातावरण आणि मराठा फॅक्टरने (Maratha Factor) बीड लोकसभेतील प्रस्थापित राजकीय समीकरणांचा पार चोळामोळा केल्याचे दिसून आले.
बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांना नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या बजरंग सोनावणे यांना राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण होते, त्याचा बराच फायदा झाला. बीडमध्ये मराठा आरक्षणामुळे जातीय संघर्ष पाहायला मिळाला. हे दोन्ही फॅक्टर्स निर्णायक ठरले असले तरी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राऊंडवर झोकून देऊन काम केले. शरद पवार गट आणि मविआचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले. या सगळ्यांनी एकत्र येत राज्यात महायुतीविरोधात निर्माण झालेला असंतोष इन्कॅश करण्याचा प्रयत्न ठरला, हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला. या सगळ्यामुळे बजरंग सोनावणे हे निवडून आले.
विजयानंतर बजरंग सोनावणे रात्री अडीच वाजता जरांगे पाटलांच्या भेटीला
बीड लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मला फायदा झाला, अशी कबुली बजरंग सोनावणे यांनी अगोदरच दिली होती. त्यामुळे बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्रीच अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रात्री अडीच वाजता बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनावणे यांची ताकद वाढवल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची नाट्यमय मतमोजणी
पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर
दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर
सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर
सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर
दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर
11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर
12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर
13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर
15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर
18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर
19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर
20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर
21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर
22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर
23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर
24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर
25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर
26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर
27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर
28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर
29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर
30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर
31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर
32 वी फेरी - बजरंग सोनावणे 6553 मतांनी आघाडीवर
आणखी वाचा