एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election 2024: अलिबाग-मुरुड मतदार संघावर काँग्रेसचा दावा; शेकापनेही शड्डू ठोकल्याने महाविकास आघाडीत नव्या वादाला सुरुवात

Alibaug Assembly constituency: शेतकरी कामगार पक्षही अलिबाग मतदार संघावर करतोय दावा

Maharashtra Vidhansabha Election 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केलीय. सर्वचर्चित आणि राजकीय सामाजिक दृष्या महत्वपूर्ण मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग-मुरुड मतदार संघात (Alibaug Assembly constituency) महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा  नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पुर्वी शेकापचा बालेकिल्ला असणारा हा मतदार संघ (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024) आता शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असला तरी पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने हा गड आपल्याकडे मिळविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. एकूणच या मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसतायेत. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी या मतदार संघात मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरवात केलीय. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय चूरसपूर्ण लढत होईल असेच चित्र दिसून येतंय. 

ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू- प्रवीण ठाकूर

रायगड जिल्ह्यात काँग्रेसची जास्त ताकद ही अलिबाग मतदार संघात असून ही जागा आम्हालाच मिळावी असा आग्रह सुध्दा ठाकुर यांनी धरला आहे. तर शेकापने यंदा हा मतदारसंघ आम्हाला देऊन त्यांनी अन्य जागेवर उमेदवारी लढवण्याची भाषा देखील ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आता अलिबाग मुरुड मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडतीलचं आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास देखील प्रवीण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलाय.प्रवीण ठाकुर हे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मोठे चिरंजीव आहेत. शिवाय काँग्रेसचे ते महाराष्ट्र प्रदेश चिटणीससुध्दा आहेत. त्यांना प्रशासनाचा आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्यानं काँग्रेसकडून आता त्यांच्या नावाची चर्चा आहे.

अलिबाग विधानसभा- 

2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.

संबंधित बातमी:

रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget