महायुतीचं तुफान वारं, राष्ट्रवादीही सुस्साट, अजितदादांची फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळजवळ स्पष्ट झाला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतं टाकल्याचं दिसतंय. या विजयानंतर अजित पवार यांनी तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेला महायुतीला भरभरून मतं दिली आहेत. एकट्या भाजपा पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळत आहे. त्यामुळे आता महायुती राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महायुतीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे. या फोटोसोबत त्यांनी तीन ओळींचे खास कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापर
या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, अजित पवार यांनी प्रचारासाठी खास रणनीती आखली होती. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांच्या प्रचारयात्रेत गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापर करण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी प्रचारमोहिमेसाठी गुलाबी रंगाचा वापर केला होता. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं ट्विट केलं आहे.
Maharashtra Chooses Pink 🙏🏻#MaharashtraElectionResult pic.twitter.com/0LqcGWwh3A
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 23, 2024
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतचा निकाल काय सांगतो?
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. या आकडेवारीनुसार भाजपाला या निवडमुकीत 126 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना हा पक्ष 54 जागांवर आघाडीवर आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष 38 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष हा 19 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.
सध्याची स्थिती पाहता आता महायुतीच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. महायुतीत सत्तास्थापनेच्या हलाचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा :
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा