![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assembly Election Result | 'कौल मराठी मनाचा' कुणाच्या बाजूने, राज्यातील लक्षवेधी लढती
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे. राज्यातील अनेक लढतींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यातील काही महत्त्वाच्या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचच नाही, तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सर्वात मोठी लढत शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढणार पहिले नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
![Assembly Election Result | 'कौल मराठी मनाचा' कुणाच्या बाजूने, राज्यातील लक्षवेधी लढती Maharashtra Election Results 2019, Important candidates and results, Live Updates, aditya Thackeray Assembly Election Result | 'कौल मराठी मनाचा' कुणाच्या बाजूने, राज्यातील लक्षवेधी लढती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/24073127/big-fights.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कौल मराठी मनाचा, कुणाच्या बाजूने आहे हे आज स्पष्ट होईल. राज्यातील 3237 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मात्र काही मतदारसंघांमधील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचच नाही, तर देशाचा लक्ष लागलं आहे. या निकालांनंतर राज्यातील राजकीय भविष्य काय असेल आणि राज्याची सत्ता कोणाच्या हाती असेल हे समोर येईल.
राज्यातील सर्वात मोठी लढत शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढणार पहिले नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून येतील, मात्र किती मताधिक्याने निवडून येतील याकडे आमचं लक्ष आहे, असं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. आदित्य ठाकरेंसमोर तगडं आव्हानही दिसलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरेश माने यांना वरळी मतदारसंघातून लढत आहेत.
एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या भाऊ-बहीण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दुसरी महत्त्वाची लढत आहे. परळी विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीत सर्वांच लक्ष वेधलं. मतदानाच्या एक दिवस आहेत, याठिकाणी मोठा पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचा त्यांना फटका बसू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र निकालानंतर नेमका मतदारांना काय कौल दिलाय ते स्पष्ट होईल.
राज्यातील महत्त्वाच्या लढती
नागपूर दक्षिण-पश्चिम
देवेंद्र फडणवीस, भाजप विरुद्ध आशिष देशमुख, काँग्रेस
वरळी मतदारसंघ
आदित्य ठाकरे, शिवसेना विरुद्ध सुरेश माने, राष्ट्रवादी
बारामती
अजित पवार, राष्ट्रवादी विरुद्ध गोपीचंद पडळकर, भाजप
कर्जत-जामखेड
रोहित पवार, राष्ट्रवादी विरुद्ध राम शिंदे, भाजप
कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज पाटील, काँग्रेस विरुद्ध अमल महाडिक, राष्ट्रवादी
परळी
पंकजा मुंडे, भाजप विरुद्ध धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
केज
नमिता मुंडदा, भाजप विरुद्ध पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी
बीड
जयदत्त क्षीरसागर, शिवसेना विरुद्ध संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
कोथरुड
चंद्रकांत पाटील, भाजप विरुद्ध किशोर शिंदे, मनसे
कणकवली
नितेश राणे, भाजप विरुद्ध सुतीश सावंत, शिवसेना
शिर्डी
सुरेश थोरात (काँग्रेस) विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
साकोली नाना पटेल, काँग्रेस विरुद्ध परिणय फुके, भाजप बल्लाळपूर सुधीर मुनगंटीवार, भाजप विरुद्ध विश्वास झाडे, काँग्रेस परतूर बबनराव लोणीकर, भाजप विरुद्ध सुरेशकुमार जेठालिया, काँग्रेस जालना अर्जुन खोतकर, शिवसेना विरुद्ध किसनराव गोरंटियाल, काँग्रेस सिल्लोड अब्दुल सत्तार, शिवसेना विरुद्ध खैसर आझाद, काँग्रेस येवला छगन भुजबळ, राष्ट्रवादी विरुद्ध संभाजी पवार, शिवसेना नाशिक मध्य देवयानी फरांदे, भाजर विरुद्ध हेमलता पाटील, काँग्रेस पालघर श्रीनिवास वनगा, शिवसेना विरुद्ध योगेश नम, काँग्रेस नालासोपारा प्रदीप शर्मा, शिवसेना विरुद्ध क्षितीज ठाकूर, बविआ ओवळा माजीवडा प्रताप सरनाईक, शिवसेना विरुद्ध विक्रांत चव्हाण, काँग्रेस कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे, शिवसेना विरुद्ध हिरालाल भोईर, काँग्रेस मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी विरुद्ध दीपाली सय्यद, शिवसेना ऐरोली गणेश नाईक, भाजप विरुद्ध गणेश शिंदे, राष्ट्रवादी बेलापूर मंदा म्हात्रे, भाजप विरुद्ध अशोक गावडे, राष्ट्रवादी घाटकोपर राम कदम, भाजप विरुद्ध आनंद शुक्ला, काँग्रेस वडाळा कालिदास कोळंबकर, भाजप विरुद्ध शिवकुमार लाड, काँग्रेस माहिम सदा सरवणकर, शिवसेना विरुद्ध संदीप देशपांडे, मनसे मलबार हिल मंगलप्रभात लोढा, भाजप विरुद्ध हिरा देवासी, काँग्रेस कसबा पेठ मुक्ता टिळक, भाजप विरुद्ध अरविंद शिंदे, काँग्रेस निलंगा संभाजी पाटील निलंगेकर, भाजप विरुद्ध अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेस औसा अभिमन्यू पवार, भाजप विरुद्ध बसवराज पाटील, काँग्रेस बार्शी दिलीप सोपल, शिवसेना विरुद्ध निरंजन भूमकर, राष्ट्रवादी सातारा शिवेंद्रराजे भोसले, भाजप विरुद्ध दीपक पवार, राष्ट्रवादी गुहागर भास्कर जाधव, शिवसेना विरुद्ध सहदेव बेटकर, राष्ट्रवादी कणकवली नितेश राणे, भाजप विरुद्ध सतीश सावंत, शिवसेना सावंतवाडी दीपक केसरकर, शिवसेना, विरुद्ध बबन साळगावकर, राष्ट्रवादीमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)