Ralegaon Vidhan Sabha Election : राळेगावचं मैदान भाजपच्या अशोक उईकेंनी मारलं, काँग्रेसचे वसंत पुरके पराभूत
Ralegaon Assembly Election 2024 : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे अशोक उईके विजयी झाले होते. राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला पुन्हा यश मिळालं आहे.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात भाजपचे अशोक उईके पुन्हा विजयी झाले आहेत. अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वसंत पुरके यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या अशोक उईके यांना 101398 मतं मिळाली. वसंत पुरके यांना 98586 मतं मिळाली. अशोक उईके यांना 2812 मतांनी विजयी मिळाला. .
राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक उईके आणि वसंत पुरके यांच्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील लढत झाली होती. राळेगाव मतदारसंघातून त्यावेळी अशोक उईके यांनी वसंत पुरके यांचा पराभव केला होता. अशोक उईके यांना 90283 मतं मिळालेली. तर, वसंत पुरके यांना 80948 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या माधव कोहळे यांनी घेतलेली मतं देखील लक्षणीय होती. वंचितच्या माधव कोहळे यांना 10705 मतं मिळाली होती.
वसंत पुरके अन् अशोक उईके पुन्हा आमने सामने
वसंत पुरके आणि अशोक उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक उईके यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
लोकसभा निवडणुकीत काय घडलेलं?
यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात महायुतीमधून शिवसेनेच्या राजश्री पाटील लोकसभा निवडणूक लढवत होत्या. तर, महाविकास आघाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख रिंगणात होते. राजश्री पाटील यांना 75617 मतं मिळाली होती. तर, संजय देशमुख यांना 100294 मतं मिळाली होती.
लोकसभेला मतदारांचा कौल मविआकडे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातून भाजपचे 5 आमदार निवडून आले होते. तर, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांना, चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि हिंगोलीचे ठाकरेंच्या सेनेचे नागेश आष्टीकर यांना आघाडी मिळाली होती. एकमेव पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईक यांनी महायुतीच्या राजश्री पाटील यांना आघाडी दिली होती.
इतर बातम्या :