एक्स्प्लोर

Karjat Jamkhed Assembly Constituency : मोठी बातमी! कर्जत जामखेडचा गड रोहित पवारांनी राखला, शेवटच्या फेरीपर्यंत चुरस, शेवटी 1200 मतांनी दणक्यात विजय!

Maharashtra Assembly Election 2024 : कर्जत जामखेड मतदार संघामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदेंमध्ये सामना रंगणार आहे.

Rohit Pawar vs Ram Shinde Karjat Jamkhed Assembly constituency 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस रंगली होती. शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अवघ्या 1 हजार 255 मतांनी विजय मिळवला. परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळे निकालाची घोषणा लांबणीवर पडली आहे. सुरूवातीपासून मजमोजणीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोचत होती. कारण राम शिंदे कधी पुढे असायचे, तर रोहित पवार (Rohit Pawar) पुढे असायचे. शेवटी राम शिंदेंकडून रोहित पवारांनी विजय खेचून आणतील.

कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत रोहित पवार 391 मतांची आघाडी होती. परंतु राम शिंदे यांनी परत फेर मोजणीचा अर्ज दिला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच लागली. यानंतर फायनल मतमोजणीनंतर रोहित पवारांना 1 लाख 27 हजार 688 मते मिळाली तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली.  

2019 च्या विधानसभेला कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. कर्जत- जामखेड मतदार संघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते.  या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते.  राम शिंदे यांना 92 हजार 477 मते पडली होती. तर रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला होता.

त्याआधी 2014 च्या निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पक्षाने गुलाल उधळला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे आणि शिवसेनेचे रमेश भिवराव खाडे यांच्यामध्ये सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपचे राम शंकर शिंदे 84,058 मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे रमेश भिवराव खाडे 37,816 मतांनी पराभूत झाले होते.  

हे ही वाचा -

Maharashtra Vidhnsabha Election 2024 : 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, दिग्गजांचे गड ढासळले, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात दिग्गजांचा पराभव

Eknath Shinde Shiv sena All Candidate List: एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल, एका क्लिकवर; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा पराभव

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget