एक्स्प्लोर

महाजनादेश यात्रेच्या समारोपात पंतप्रधान, मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोहळा नाशिकमध्ये झाला. या सोहळ्यातील भाषणात पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत विरोधकांवर टीकाही केली.

नाशिक : "शरद पवारांसारखे अनुभवी नेतेही मताचं राजकारण करतात. त्यांना शेजारचा देश खूप चांगला वाटतो, त्यांची मर्जी पण सगळ्या देशाला माहित आहे की दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोहळा नाशिकमध्ये झाला. या सोहळ्यातील भाषणात पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत विरोधकांवर टीकाही केली. पवार काय म्हणाले होते? पाकिस्तान आणि भारतात वेगळीच फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात केलं होतं. "पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत. देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जातं आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे". काही मतांसाठी शरद पवार मतांचं राजकारणं करतात पवारांच्या या विधानावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कलम 370 च्या मुद्द्यावर काँग्रेसचा संभ्रम मी समजू शकतो. पण शरद पवार? त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्यानेही मतांचं राजकारण करावं? शेजारी देश त्यांना खूप चांगला वाटतोय, हे त्यांचं आकलन असेल. पण सगळ्या देशाला माहिती आहे दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही शरद पवारांवर टीका "मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्यायला महाराष्ट्रात जात आहेत, असं म्हणतात. असे हिशेबनीस आमच्या घरी पूर्वी लिहायला असायचे. कोण ते मी सांगत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात उत्तर दिलं. ते म्हणाले की, "शरद पवारजी तुमची मानसिकताच राजेशाही होती. सेवकाचं काम असतं जनतेमध्ये जाऊन हिशोब देणं. म्हणून लोकांनी तुमचा पराभव करुन सेवकांना निवडून दिलं. यापुढेही ते सेवकांना निवडून देतील. काँग्रेसचं तर महाराष्ट्रात अस्तित्वच दिसत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींचं नेतृत्त्व आणि शिवरायांचा आशिर्वाद होता आता तर त्यांच्या वंशाचीही आम्हाला सोबत आहे." पवारही बीडमधून लढले तरी जिंकणार नाहीत : पंकजा मुंडे तर महिला बालकल्याण आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील भाषणातून शरद पवारांना टोला लगावला. "खुद्द शरद पवार जरी बीड शहरातून निवडणुकीला उभे राहिले तरी बीडची जनता त्यांना निवडून देणार नाही," असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता परळीत पुन्हा एकदा मुंडे भावा-बहिणीतला संघर्ष पाहायला मिळणार आहे. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: 28 तासांनी विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
28 तासांनी विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : 'पदवी केली पश्चाताप झाला, सतीश इट्स डन ब्रो!'मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत 'जेन Z' मतदारांच्या चिठ्ठ्यांची एकच चर्चा; उमेदवारांना सणसणीत टोले
'पदवी केली पश्चाताप झाला, सतीश इट्स डन ब्रो!'मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत 'जेन Z' मतदारांच्या चिठ्ठ्यांची एकच चर्चा; उमेदवारांना सणसणीत टोले

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोललेला नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोललेला नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Embed widget