एक्स्प्लोर

Loksabha Result 2024 : EVM पेटवलेल्या मतदारसंघात कोण जिंकलं? वाचा सविस्तर निकाल एका क्लिकवर 

सांगोला तालुक्यात बागलवाडी या गावात मतदानावेळी म्हणजे 7 मे रोजी EVM पेटवल्याची घटना घडली होती. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत.

Madha Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) जवळपास सगळे निकाल हाती आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीन चांगली कामगिरी केली आहे. 48 पैकी राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 18 जागा मिळाल्या आहेत. यातीलच चर्चेत राहीलेला एत मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Loksabha Election Result) या मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बागलवाडी या गावात मतदानावेळी म्हणजे 7 मे रोजी EVM पेटवल्याची घटना घडली होती. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघाची राज्यात जोरदार चर्चा होती. या मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. 

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन पेटवल्याची (voter set the EVM machine on fire) घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव झाला आहे.  

माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे माढा.  मतादानावेळी या मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. सांगोला तालुक्यात देखील 60 टक्के मतदान होताना हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटना समोर आल्या होत्या. यात बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोचल्यानं पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी सभा घेतली होती. तर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.  

किती मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी?

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार धैर्यशील मोहिते पाटील हे 1 लाख 19 हजार 395 मतांनी विजयी झाले आहेत. मोहिते पाटील यांना एकूण 6 लाख 18 हजार 566 मते मिळाली आहेत. तर रणजितसिंह निंबाळकरांना एकूण 499171 मते मिळाली आहेत. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. त्यामुळं या जागेवर कोण निवडूण येणार याची सर्वत्र चर्चा होती. पण अखरे महाविकास आघाडीचे उमेदवर मोहिते पाटील विजयी झाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Western Maharashtra Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका; पश्चिम महाराष्ट्रात कोण विजयी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget