Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करणार? उत्तराखंडमधून लढवणार निवडणूक?
दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यामुळे विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
![Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करणार? उत्तराखंडमधून लढवणार निवडणूक? Late CDS Journal Bipin Rawats brother Retired Colonel Vijay Rawat may join BJP Sources Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करणार? उत्तराखंडमधून लढवणार निवडणूक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/6c063fb725856d365eac199d65a1a0f0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विजय रावत यांनी नुकतीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
विजय रावत आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विजय रावत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. "आमच्या कुटुंबाची विचारधारा भाजपशी मिळतीजुळती आहे. मला भाजपसाठी काम करायचे आहे. भाजपने म्हटले तर मीही निवडणूक लढवणार असे मत विजय रावत यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आज विजय रावत यांची भेट घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, " जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबाने देशासाठी केलेल्या सेवेला आम्ही सलाम करतो. त्यांच्या स्वप्नासारखा उत्तराखंड बनवण्यासाठी मी नेहमीच काम करेन."
आज दिल्ली में देश के प्रथम CDS और उत्तराखण्ड के अभिमान स्वर्गीय श्री बिपिन रावत जी के भाई कर्नल विजय रावत जी से भेंट की। बिपिन रावत जी व उनके परिवार द्वारा की गई राष्ट्रसेवा को हमारा नमन है। मैं सदैव उनके सपनों के अनुरूप उत्तराखण्ड बनाने हेतु कार्य करता रहूंगा। pic.twitter.com/iACim4sNqG
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) January 19, 2022
उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला होणार मतदान
उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- CDS Bipin Rawat Chopper Crash : सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं कारण आले समोर, एअरफोर्सच्या चौकशी समितीने दिली माहिती
- CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? लवकरच येणार तपास यंत्रणेचा अहवाल
- CDS Bipin Rawat News : सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं कारण काय? मोठी माहिती समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)