एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाच्या लोगोचा गैरवापर करून प्रचाराचा खोडसाळपणा, कायदेशीर कारवाई होणार
राजकीय फायद्यासाठी माझाच्या लोगोचा वापर करून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीचा खोडसाळ प्रसार करणाऱ्या पोस्ट विना पडताळणी शेअर करू नये असे आवाहन एबीपी माझाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई : एबीपी माझाचा लोगो वापरून निवडणूक काळात खोडसाळ प्रचार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये असा प्रकार समोर आल्यानंतर रीतसर तक्रार करण्यात आली आहे. यानंतर आज कोल्हापूरमध्ये देखील एबीपी माझाचा लोगो वापरून खोडसाळ प्रचार केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
एबीपी माझाच्या लोगोचा गैरवापर करून निवडणूक काळात अफवा पसरवल्याप्रकरणी सोलापुरात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. उद्या, 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काही अज्ञातांनी एबीपी माझाच्या लोगोचा गैरवापर केला आहे. माझाचा लोगो वापरून मोहोळ मतदारसंघाबाबत चुकीचा मजकूर पसरवण्याचं काम काही अज्ञात करत आहेत. ही बाब लक्षात येताच एबीपी माझानं याबाबत रितसर तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईची विनंती केली आहे.
एबीपी माझाच्या लोगोचा वापर करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाबद्दल खोटा सर्व्हे व्हायरल करण्यात येत आहे. अशी कोणीतही बातमी एबीपी माझाने चालवलेली नाही. फोटोतील फॉन्ट एबीपी माझाचा नाही. सदरचे फोटो हे फोटोशॉपवर एडिट केलेले आहेत. माझाच्या लोगोचा अनधिकृत वापर रीतसर कारवाईस पात्र असून या प्रकरणी तक्रार दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली आणि बीडमध्ये देखील असाच खोडसाळ प्रकार समोर आला आहे.
हा खोडसाळपणा आहे, अफवांना बळी पडू नये.
राजकीय फायद्यासाठी माझाच्या लोगोचा वापर करून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीचा खोडसाळ प्रसार करणाऱ्या पोस्ट विना पडताळणी शेअर करू नये असे आवाहन एबीपी माझाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement