एक्स्प्लोर
Advertisement
मी या निवडणूकीत 'इतके' पैसे खर्च करणार आहे : उद्योजक रामदास माने
देशभरात 'टॉयलेट मॅन' अशी ओळख असलेले उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत आहेत. माने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्यांच्या निवडणुकीच्या बजेटविषयी माहिती दिली.
मुंबई : देशभरात 'टॉयलेट मॅन' अशी ओळख असलेले उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत आहेत. माने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या बजेटविषयी माहिती दिली. माने म्हणाले की, मी निवडणुकीसाठी केवळ तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करणार आहे.
माने आपल्या निवडणुकीच्या बजेटविषयी म्हणाले की, मी निवडणुकीवर केवळ तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करत आहे. 25 हजार रुपयांचे डिपॉझिट, 70 हजार रुपयांचे डिझेल, 70 हजार रुपये प्रसिद्धीपत्रके आणि इतर प्रचाराची पत्रकं छपाई करण्यासाठी आणि उर्वरीत पैसे माझ्यासोबत प्रचाराचे काम करणाऱ्या लोकांसाठी खर्च होतील. माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त लोक प्रचाराचे काम करत आहेत. त्यांचे जेवण, प्रवास आणि इतर कामांसाठी पैसे उर्वरित पैसे खर्च केले जातील.
माने यांनी आपण मोठ्या जाहीर सभा घेणार नसल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले आहे. माने म्हणाले की, मी केवळ घरोघरी जाऊन लोकांची भेट घेणार आहे. त्याच माध्यमातून माझा प्रचास होईल.
दरम्यान माने यांनी त्यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची खळबळजनक माहितीदेखील दिली. माने म्हणाले की, "मी ज्या दिवशी माढा लोकसभेतून माझा उमेदवारी अर्ज भरला, त्या दिवशीच माझ्यावर उमेदवारी अर्ज भरु नये यासाठी दबाव आणला जात होता. परंतु तरिही मी अर्ज भरला. अर्ज भरला त्या दिवसापासून दररोज 10-15 माणसं माझ्याकडे येतात आणि उमेदवारी अर्ज मागे घ्या असे मला सांगतात. परंतु मी अर्ज मागे घेणार नाही."
VIDEO | लोकसभेचे उमेदवार रामदास माने आणि डॉ. अनिल कुमार यांच्याशी खास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement