एक्स्प्लोर
Advertisement
हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचं निवडणूक चिन्हं अडचणीत
'शिट्टी' या चिन्हावर बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष वर्चस्व गाजवलं आहे. शिट्टी या चिन्हावर बहुजन विकास आघाडीचे दोन आमदारही निवडून आलेले आहेत.
ठाणे : 'शिट्टी' या चिन्हाच्या जोरावर गेली अनेक वर्षे वसई विरार भागात सत्ता गाजवणारी बहुजन विकास आघाडी चांगलीच अडचणीत आली आहे. शिट्टी हे निवडणूक चिन्ह बहुजन महापार्टी यांचे अधिकृत चिन्ह असल्याचं गॅझेट आता प्रसिद्ध झाल्याने हितेंद्र ठाकूर यांचा 'बविआ' कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हा मोठा प्रश्न आहे.
'शिट्टी' या चिन्हावर बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष वर्चस्व गाजवलं आहे. शिट्टी या चिन्हावर बहुजन विकास आघाडीचे दोन आमदारही निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत सामील झालेली बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये आपला उमेदवार उतरवणार आहे. मात्र तो कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
बहुजन महापार्टी या पक्षाची नोंदणी जानेवारी 2017 ची असून या पक्षाची ही पहिली निवडणूक आहे. या पक्षाने देशात तब्बल 100 उमेदवार उभे केले असून राज्यात 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या सहा तारखेला आणखी काही उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी शमशुद्दीन खान यांनी दिली. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement