Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिला अडीच वर्षांसाठी हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्चित झालं आहे.

Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा बिगुल अखेर आज (13 जानेवारी) वाजला. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सुद्धा धुरळा उडणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिला अडीच वर्षांसाठी हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्चित झालं आहे. चंदगडमधील चारही गटावर महिला आरक्षण, दोन खुल्या प्रवर्गातील महिला असतील. दुसरीकडे, भुदरगड तालुक्यामध्येही चार गटावर महिला राज, तीन खुल्या, एक ओबीसी असे चित्र आहे. त्यामुळे आता निवडणूक घोषित झाल्याने गावगाड्यात राजकारणाला वेग येणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग 18, खुला 20, खुला महिला 19, अनुसूचित जाती 4, अनुसूचित जाती महिला 6, अनुसूचित जमाती 1 असे गटनिहाय आरक्षण निश्चित झालं आहे.
कोल्हापूर झेडपी आरक्षणात अनेकांना धक्का
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामधील 68 गटांसाठीच आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये शौमिका महाडिक, अरुण इंगवले, अंबरिश घाटगे, विजय भोजे, युवराज पाटील, सतीश पाटील, प्रवीण यादव, मनोज फराकटे, पद्मराणी पाटील, मनीषा माने यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने मोठा झटका बसला आहे. माजी अध्यक्ष उमेश आपटे, बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सभापती सर्जेराव पेरीडकर, हंबीरराव पाटील, विजय बोरगे, हेमंत कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांचे मतदारसंघ सुरक्षित आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 9 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन स्वीकारणे - 16 जानेवारी ते 21 जानेवारी
- उमेदवारी अर्जांची छाननी - 22 जानेवारी 2026
- अर्ज माघारीची अंतिम मुदत - 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत
- अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप - 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर
- मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
- मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता पासून
झेडपी आरक्षण : भुदरगड, चंदगड तालुक्यात 'महिलाराज'
शाहुवाडी तालुका
१. शित्तूर तर्फ वारूण - खुला
२. सरूड ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)
३. बांबवडे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग)
४. आंबार्डे - खुला (महिला)
पन्हाळा तालुका
५. सातवे - खुला
६. कोडोली - खुला
७. पोर्ले तर्फ ठाणे - खुला
८. यवलूज - खुला (महिला)
९. कोतोली- ओबीसी (महिला)
१०. कळे ओबीसी (महिला)
हातकणंगले तालुका
११. घुणकी ओबीसी (महिला)
१२. भादोले- अनुसुचित जाती (महिला)
१३. कुंभोज खुला (महिला)
१४. आळते - अनुसुचित जाती (महिला)
१५. शिरोली पुलाची - ओबीसी
१६. रूकडी- अनुसुचित जाती
१७. रूई - अनुसुचित जाती
१८. कोरोची- खुला (महिला)
१९. कबनूर - अनुसुचित जाती
२०. पट्टणकोडोली - अनुसुचित जाती
२१. रेंदाळ - खुला
शिरोळ तालुका
२२. दानोळी अनुसुचित जाती (महिला)
२३. उदगांव ओबीसी
२४. आलास - खुला
२५. नांदणी - अनुसुचित जमाती (महिला)
२६. यड्राव - ओबीसी (महिला)
२७. अब्दूललाट - अनुसुचित जाती (महिला)
२८. दत्तवाड - खुला (महिला)
कागल तालुका
२९. कसबा सांगाव अनुसुचित जाती (महिला)
३०. सिद्धनेर्ली - ओबीसी (महिला)
३१. बोरवडे- खुला (महिला)
३२. म्हाकवे - ओबीसी
३३. चिखली खुला (महिला)
३४. कापशी ओबीसी (महिला)
करवीर तालुका
३५. शिये ओबीसी
३६. वडणगे - खुला
३७. उचगांव - खुला
३८. मुडशिंगी - ओबीसी
३९. गोकुळ शिरगांव- खुला
४०. पाचगांव - खुला
४१. कळंबे तर्फ ठाणे- खुला (महिला)
४२. पाडळी खुर्द- खुला
४३. शिंगणापूर - खुला (महिला)
४४. सांगरूळ खुला (महिला)
४५. सडोली खालसा खुला
४६. निगवे खालसा खुला
गगनबावडा तालुका
४७. तिसंगी खुला (महिला)
४८. असळज खुला
राधानगरी तालुका
४९. राशिवडे बुद्रुक - खुला
५०. कसबा तारळे - खुला (महिला)
५१. कसबा वाळवे ओबीसी
५२. सरवडे - खुला (महिला)
५३. राधानगरी - खुला
भुदरगड तालुका
५४. गारगोटी खुला (महिला)
५५. पिंपळगांव खुला (महिला)
५६. आकुर्डे ओबीसी (महिला)
५७. कडगांव खुला (महिला)
आजरा तालुका
५८. उत्तर- खुला
५९. पेरणोली - खुला
गडहिंग्लज तालुका
६०. कसबा नूल - ओबीसी
६१. हलकर्णी - खुला
६२. भडगाव - खुला
६३. गिजवणे (खुला महिला)
६४. नेसरी खुला
चंदगड तालुका
६५. आडकूर (खुला महिला)
६६. माणंगाव - ओबीसी महिला
६७. कुदनूर - खुला (महिला)
६८. तुडये (ओबीसी महिला)
इतर महत्वाच्या बातम्या




















