एक्स्प्लोर

Deolali Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : देवळालीतून सरोज अहिरे, राजश्री अहिरराव की योगेश घोलप? कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Deolali Vidhan Sabha Constituency : 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश बबनराव घोलप यांचा 41702 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. 

Deolali Vidhan Sabha Constituency : देवळाली विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) महायुतीतून (Mahayuti) दोन उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire), तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचे चिरंजीव योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सरोज अहिरे की राजश्री अहिरराव की योगेश घोलप? कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख होती. शिवसेनच्या माध्यमातून घोलप कुटुंबीयांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एकहाती आपल वर्चस्व कायम राखले होते. युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलापंच नाव घेतले जाते. बबनराव सलग पाच वेळा निवडून आले आहेत. दोन वेळा अपक्ष निवडणूक लढविली आहे. बबनराव घोलप यांनी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना 2014 सालच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले. या निवडणुकीत योगेश घोलप यांचा विजय झाला. तर 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश बबनराव घोलप यांचा 41702 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. 

देवळालीत तिरंगी लढत 

यंदाच्या निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. कारण महायुतीत अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी विशेष विमानाने एबी फॉर्म पाठवला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतून सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव या दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांनी उमेदवारी दिली. आता सरोज अहिरे विरुद्ध राजश्री अहिरराव विरुद्ध योगेश घोलप यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget