BJP Maharashtra: भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना
BJP Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
BJP Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना-
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी भाजपकडून 'भावांतर योजने'ची घोषणा केली. कापूस सोयाबीनचे भाव पडल्यावर भावांतर योजनेतून पैसे दिले आहेत. एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजन राबविण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये
शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना
प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन
वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता 2100 रुपये करणार
25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार
10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार
फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल
एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी
शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न
2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न
महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार
15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असेल
युवात फिटनेस असला पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार
गडकिल्लांसाठी प्राधिकरण तयार करणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण करणार
संकल्पपत्र जाहीर झाल्यानंतर अमित शाह काय म्हणाले?
संकल्पपत्रचे प्रकाशित झाले ते राज्याच्या भूमीतील आकांशाचे प्रतिक आहे. देशाचे नेतृत्व करत आहे, भक्ती आंदोलनाची सुरुवात राज्यातून झाली. गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आंदोलन इथूनच सुरु झाले. महायुतीची सरकार चालत आहे, यात शेतकरी आणि गरीबांचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. मला आनंद आहे, आंबेडकर यांच्या भूमीवर असताना काश्मीरमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ आंबेडकर यांनी केलेल्या संविधानाने झाला, असं अमित शाह यांनी सांगितले. सुरक्षित महाराष्ट्र कसा असायला हवी याची योजना असायला हवी. महाविकास आघाडीची सर्व योजना सत्तेच्या लालसेपोटी आहे, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.