भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातून 17 उमेदवार रिंगणात; मराठा उमेदवारांना सर्वाधिक संधी, नव्या समीरकरणाची चर्चा!
मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी आज भाजपकडून जाहीर करण्यात आली असून मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मनोज जारंगे पाटील यांचा फॅक्टर कमी कसा करता येईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी आज भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. तर एक ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्यावेळी भाजपने मराठवाड्यात 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र यंदा भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप मराठवाड्यात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही, गेल्यावेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे संभाजीनगर मधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तीन अपक्षांना उमेदवारी, नेत्यांची मुलंही मैदानात
दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सख्ख्या भावांना तिकीट देण्यात आलं आहे. तीन अपक्षांना उमेदवारी देण्यात आली असून नेत्यांची मुलंही मैदानात आहेत. घराणेशाहीवर सातत्याने बोललं जात असताना मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाला मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. भोकरमधून भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त
दरम्यान, विदर्भामधून सर्वाधिक कुणबी उमेदवार देण्यात आले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. सर्वाधिक संवेदनशील झालेल्या मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मनोज जारंगे पाटील यांचा फॅक्टर कमी कसा करता येईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलं आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तीन अपक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये महेश बालदी यांचा सुद्धा समावेश आहे, तर अन्य दोन अपेक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये राजेश बकाने यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे, तर विनोद अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते.
मराठवाड्यातील भाजपच्या 'या' उमेदवारांना संधी
फुलंब्री विधानसभा
हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा
अतुल सावे
गंगापूर विधानसभा
प्रशांत बंब
किनवट विधानसभा
भीमराव केराम
नायगाव विधानसभा
राजेश पवार
मुखेड विधानसभा
तुषार राठोड
हिंगोली विधानसभा
तानाजी मुटकुळे
जिंतूर विधानसभा
मेघना बोर्डीकर
परतूर विधानसभा
बबन लोणीकर
बदनापूर विधानसभा
नारायण कुचे
भोकरदन विधानसभा
संतोष दानवे
गेवराई विधानसभा
वेटिंग
केज विधानसभा
नमिता मुंदडा
निलंगा विधानसभा
संभाजी पाटील निलंगेकर
औसा विधानसभा
अभिमन्यू पवार
तुळजापूर विधानसभा
राणा जगजितसिंह पाटील
भोकर विधानसभा
श्रीजया चव्हाण
हे ही वाचा