एक्स्प्लोर

Beed Lok Sabha: बीड जिल्ह्यात सोशल मीडिया अंडर पोलीस सर्व्हिलांस; आक्षेपार्ह पोस्ट नाही, ग्रुप ॲडमिनवरही करडी नजर

Beed Lok Sabha Election: बीड जिल्ह्यात सोशल मीडिया अंडर पोलीस सर्व्हिलांसमध्ये असणार आहे. आक्षेपार्ह्य पोस्ट, ग्रुप ॲडमिनवरही करडी नजर ठेवली जाणार आहे.

Beed Lok Sabha Election Result 2024 Updates: बीड : लोकसभा निवडणूक निकालासाठी (Lok Sabha Election Result 2024) संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशाचा नवा पंतप्रधान कोण? याचं उत्तर  पार्श्वभूमीवर अवघ्या काही तासांतच मिळणार आहे. अशातच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी (Beed Police) अनोखी कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावरची देखरेख वाढवली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप अॅडमिनवर बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाची सर्व स्तरांतून चर्चा सुरू आहे. 

4 जूनच्या मतमोजणीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील सोशल मीडिया अंडर पोलीस सर्व्हीलांस असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर व्हाट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली, तर ग्रुप ॲडमिनवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, निवडणूक निकालानंतर डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विजयी उमेदवारासाठी मिरवणूक काढायची असल्यास परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. कोणालाही विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही, असं बीड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर ओन्ली ॲडमिन अशी सेटिंग करून घेण्यात यावी, असं आव्हान बीड पोलिसांनी जिल्हातील नागरिकांना केलं आहे. 

बीड लोकसभा निवडणुकीसाठी मोठा संघर्ष झाला. विशेषतः जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे आता मतमोजणी अवघ्या 24 तासांवरती येऊन ठेपली असताना बीड पोलिसांनी सोशल मीडियावर देखरेख वाढवली आहे. विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याचं आढळून आलं, तर थेट ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्याचा निर्णय बीड पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियावरील सक्रिय 205 जणांना ताकीद देण्यात आली आहे. प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास संबंधित ग्रुप अॅडमिन कारवाई करण्यात येणार असून तशी समज पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बीडमध्ये बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे सामना 

बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेचा सामना रंगला होता. लोकसभा प्रचारादरम्यान, बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि बीडमध्ये झालेली अटीतटीची लोकसभेची लढत याकडे सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष लागल होतं. आता निकाल अवघ्या काही तासांवर आला असून लवकरच बीडमध्ये गुलाल कोण उधळणार याचा निकाल समोर येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget