एक्स्प्लोर

Amit Thackeray: अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!

Mahim Vidhan Sabha Election 2024: माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, अशी तिरंगी लढत होणार आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. त्यातच मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) आणि शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, अशी तिरंगी लढत होणार आहे. 

अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?

मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेच्या उमेदवारांच्या यादीत नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. मी लहानपणापासून या भागात वाढलोय, आम्हाला या मतदार संघातले विषय मला माहित आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहे. त्यामुळे समोर कुणीही आलं तरी मी लढणार, अशी भूमिका अमित ठाकरेंनी जाहीर केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवणार अशी चर्चाही रंगली होती. त्यानंतर काही दिवसांआधीच अमित ठाकरेंनी माहीम विधानसभेतून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभेतूनच निवडणूक लढवावी, असा एक अहवाल सादर करण्यात आला होता. दादर येथील पक्षाच्या राजगड कार्यालयातून अमित ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत असतात, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच 2019 च्या निवडणुकीत माहीममध्ये मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते देखील मिळाली होती. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी माहीम मतदारसंघच सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

अमित राज ठाकरे यांचा राजकीय परिचय-

अमित राज ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. अमित ठाकरेंचं पदवीधर, एमबीए (मार्केटिंग) असं शिक्षण आहे. राजकारण, फुटबॉल आणि व्यंगचित्र रेखाटणे ही अमित ठाकरेंची आवाड आहे. 23 जानेवारी 2020 साली अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2022 साली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ठाकरे परिवारात जन्म झाल्याने जन्मापासून अमित ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र आणि देशपातळीवरील राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार होत होते. अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला कॉलेज जीवनापासूनच सुरुवात केली. सन 2006 मध्ये राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केल्यानंतर अमित ठाकरे ही राजकारणात जास्त सक्रिय झालेले पाहायला मिळाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी माननीय राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र दौरा केलाच पण यामध्ये ठाकरे परिवाराचा सदस्य असल्याने कोणतीही जास्त अपेक्षा केली नाही.

अनेक प्रश्नांना वाचा तर फोडली-

राज ठाकरेंच्या दौऱ्यात अमित ठाकरे हे नेहमी एका कोपऱ्यात उभे राहून राज ठाकरे, संबंधित पदाधिकारी आणि मनसैनिकांना काय मार्गदर्शन करत आहेत याचा आढावा घेतला. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात तरुण पिढीला आणि समाजाला कोणते प्रश्न भेडसावत आहेत? इतर राजकीय पक्ष फक्त जनतेचा मतदानापुरता वापर करून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलत नाही आहेत, हे त्यांना कळून चुकले. यासर्व बाबींचा विचार करता राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्याअगोदर आणि केल्यावर त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा तर फोडलीच पण न्याय सुद्धा मिळवून दिला.

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंचं आव्हान वाटत नाही, उद्धव साहेबांनी आदेश दिलाय, आता जिंकूनच मातोश्रीवर येऊ: महेश सावंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget