भाजपशी युती करण्यास तयार, मात्र खासदार दिलीप गांधी नको : अनिल राठोड
राठोड यांच्या भूमिकेवर बोतलाना चंद्रकांत पाटील यांनी भाजपात गट-तट नसतो. युती करायची तर भाजपसोबत करा, भाजप युतीला तयार असल्याचं म्हटलं आहे.
अहमदनगर : अहमदनगर महापालिका निवडणूक निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कुठल्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला भाजपशी युती करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांनी भाजपशी युती करण्यासाठी तयार आहोत, पण खासदार दिलीप गांधी नको असा पवित्रा घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ, असंही अनिल राठोड म्हणाले. राठोड यांच्या भूमिकेवर बोतलाना चंद्रकांत पाटील यांनी भाजपात गट-तट नसतो. युती करायची तर भाजपसोबत करा, भाजप युतीला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजप सेना-युती करणार का? आणि ही युती आगामी निवडणुकांसाठी पहिली पायरी ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 23 जागा, शिवसेना 24, भाजप 14 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
सत्तास्थापनेसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना आणि भाजपला आघाडी करावी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर निवडणुकीतला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी झाला आहे. दरम्यान महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौरपदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचं चित्र दिसत आहे.
संबंधित बातम्या महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60 तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान Ahmadnagar Election Update : 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला? महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा महापालिका निवडणूक : अहमदनगरमध्ये मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस, उद्या मतदान आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात अहमदनगर महापालिका निवडणूक प्रचारात जादूटोणा?