TET Exam : टीईटी परीक्षेची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार परीक्षा
राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि टीईटी एकत्र आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे
राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना येत्या काळात होणार्या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.
पावसामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची 'सीईटी' पाण्यात!, शेकडो विद्यार्थ्यांना फटका, पुन्हा परीक्षा घेणार असल्याची CET सेलची माहिती
शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन 2018-19 नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI