परीक्षा होत नाहीत, शुल्क परत मिळत नाही, जिल्हा परिषद भरती रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आक्रमक
Zilla Parishad recruitment exam 2019 : राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे.
लातूर : राज्य सरकारने 2019 मध्ये घोषित केलेली जिल्हा परिषदेची भरती (Zilla Parishad recruitment exam 2019 ) रद्द केली आहे. अद्याप त्या भरती प्रक्रिया बाबत कोणतीही हालचाल नाही. बारा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षा होत नाही, परीक्षा शुल्क परत मिळत नाही, अशा अडचणीत विद्यार्थी अडकून पडले आहेत. परीक्षार्थींना दरवर्षी फक्त तारीख मिळत आहे. यातून एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतोय तो म्हणजे गोळा झालेली 25 कोटी पेक्षा जास्त परीक्षा शुल्क गेला कुठे ?
राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे. प्रक्रिया होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. मात्र अद्याप याबाबत कोणाच निर्णय झालेला नाही. उमेदवारांकडून शुल्कापोटी घेतलेले 25 कोटी 87 हजार रुपये आता नक्की कुणाकडे आहेत, असा प्रश्न 12 लाख 72 हजार उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
अतिशय हलकीच्या परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात. परीक्षा शुल्क भरणे, त्यासाठी तयारी करणे, परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याचा खर्च, असा हजारोंचा खर्च हे विद्यार्थी करत असतात. मात्र, परीक्षा रद्द झाल्यानंतर त्या परीक्षा शुल्काचं काय होतं असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलाय? एक वेळ सरकार परीक्षा शुल्क परत करेल. मात्र परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी तयारी करतात त्या परीक्षेचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होताय.
परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या विविध संघटना आता एकत्रितपणे समोर येते आहेत. राज्य सरकारतर्फे मार्च 2023 पर्यंत जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, नवीन जाहिरात येईल की नाही आणि मार्चमध्ये तरी परीक्षा होतील किंवा नाही? याबद्दल आम्हाला विश्वास नाही. रद्द केलेल्या जिल्हा भरतीची जाहिरात आणि परीक्षा एका महिन्याच्या आत घ्यावी या एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्याची माहिती राहुल कवठेकर या विद्यार्थ्याने दिली.
"साडेसहा एकर कोरडवाहू शेती असलेले वडील महिन्याला पाच हजार रुपये पाठवतात. मागील पाच वर्षापासून वडिलांच्या आर्थिक मदतीवर लातूरमध्ये विविध परीक्षांची तयारी करतोय. अडीच हजार रुपये मेस, पाचशे रुपये अभ्यासिका आणि उर्वरित पैशांमध्ये खोली भाडे व इतर खर्च अशा अडचणीत राहतोय. आर्थिक अडचणीत असताना देखील परीक्षा शुल्क भरून 2019 मध्ये तयारी केली. परंतु, ही परीक्षाच आता रद्द झालीय. शिवाय रद्द झालेल्या परीक्षेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, अशी कैफियत संतोष चोथवे या विद्यार्थ्याने मांडली हे.
घडी बावीस एकर कोरडवाहू शेती आहे. पैशाच्या ओढाताणीमध्ये लातूरमध्ये मागील पाच वर्षापासून विविध परीक्षेची तयारी करतोय. 2019 ला परीक्षा शुल्क भरले होते. ते अद्याप परत मिळाले नाही. कम्बाईन ,आरटीओ, रेल्वे ,आरोग्य विभाग अशा अनेक परीक्षेची मी तयारी करतोय. आमच्या परीक्षा वेळेवर घ्या, वेळेवर निकाल लावा, वय निघून जात आहे अशी खंत मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या माऊली काळे या विद्यार्थ्याने व्यक्त केलीय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI