नागपूरचा वेद शेंडे देशात पहिला, NEET परीक्षेत 720 पैकी 720 गुण!
NEET 2024 Result : वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालंय. यामध्ये नागपूरचा वेद शेंडे देशात पहिला आलाय.
NEET 2024 Result : वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालंय. यामध्ये नागपूरचा वेद शेंडे देशात पहिला आला आहे. वेद शेंडे याला 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. देशातील टॉप 100 जणांमध्ये महाराष्ट्रातील 11 विद्यर्थ्यांचा समावेश आहे. पदवीपूर्व वैदकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा नीट युजी 2024) परीक्षेचा निकाल चार जून रोजी जाहीर करण्यात आलाय. यंदा 23 लाख 33 हजार 297 विद्यार्थ्यांनी नशीब अजमावले होते. यापैकी 13 लाख 16 हजार विद्यार्थी पात्र ठरले. एनटीएतर्फे पाच मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती.
नागपूरमधील वेद शेंडे याने 99.99 पर्सेंटाईल घेत देशात पहिला क्रमांक पटकावलाय. तामिळनाडूच्या सय्यर अरिफिन युसुफ एम दुसरा आला, तर दिल्लीचा मृदुल आनंद तिसरा आला. राज्यासह देशातील वैदकीय शिक्षण संस्थेत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस आणि बीएचएमएस वैदकीय पदवी प्रवेश तसेच बीएस्सी नर्सिंगसाठी नीट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील.
राजस्थानची प्रचिता मुलींमध्ये पहिली -
नीट परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये एकाही मुलीचा समावेश नाही. राजस्थानच्या प्रचिता हिने देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
सोलापुरातल्या मुलीला घवघवीत यश -
सोलापुरातल्या संजय गांधी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या मुलीने घवघवीत यश संपादन केलंय. अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवलेत. विशेष म्हणजे यासाठी तिने कोणतेही क्लासेस किंवा ट्युशन लावलेले नाहीत. अल्फीया पठाण हिचे वडील मुस्तफा पठाण हे भाजी विक्री करतात तर आई हि कपड्याच्या दुकानात कामाला जातात. आई-वडील दोघे हि अल्प शिक्षित आहेत. मात्र मुलीची डॉक्टर होण्याची इच्छा असल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी शिक्षण देण्याचे ठरवले. अल्फीयाच्या या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI