शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिषदेकडून वेब पोर्टल लॉन्च; घेणार तज्ज्ञांची मदत
SCERT Maharashtra : स्टेट काउंसिल फॉर एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र ने वेब पोर्टल तयार केलं आहे. यावर कोणताही तज्ज्ञ शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आपलं मत देऊ शकतो.
SCERT Maharashtra Designs Web Portal For Expert Opinion Based On NEP 2020 : राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) ने एक वेब पोर्टल (SCERT Maharashtra Web Portal) डिझाइन केलं आहे. या पोर्टलवरुन तज्ज्ञ कोणताही विषय किंवा एखाद्या विषयावरील आपलं मत मांडू शकतात. या तज्ज्ञांनी दिलेली माहिती किंवा मांडलेली त्यांची मतं यावरुन राज्य (Maharashtra) नवीन अभ्यासक्रम तयार करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. हे पोर्टल सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, मुलांना काय आणि कसं शिकवायचं याबद्दल कोणीही आपलं मत या पोर्टलद्वारे मांडू शकणार आहे. शिक्षणाचा आणि शैक्षणिक पद्धतीचा स्तर (Maharashtra School Education) उंचावण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
NEP वर आधारित पोर्टल
SCERT (SCERT Maharashtra Web Portal) हे वेब पोर्टल NPE म्हणजेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) नुसार तयार करण्यात आलं आहे. TOI च्या अहवालानुसार, हे पोर्टल मंगळवार, 24 मे 2022 रोजी सुरु करण्यात आलं आहे. तसेच, 30 मे 2022 रोजी बंद होणार आहे. दरम्यान, ज्या तज्ज्ञांना आपली मतं नोंदवायची आहेत, ते 30 मे पूर्वी या पोर्टवरल आपली मतं नोंदवू शकतात.
कोणत्या विषयांबाबत सल्ला देता येणार?
तज्ज्ञ शैक्षणिक पद्धतीतील कोणत्याही विषयावर आपलं मत मांडू शकणार आहेत. उदाहर म्हणून समजून घ्यायचं असेल तर, प्रौढ शिक्षण, बालसंगोपन, शिक्षणाचं ध्येय, शालेय शिक्षणाचे पर्याय, कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि लैंगिक शिक्षण यांसारख्या कोणत्याही विषयातील त्यांचं मौल्यवान मत या पोर्टलद्वारे तज्ज्ञ सरकारपर्यंत पोहोचवू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CBSE 10th 12th Board Exam Pattern : आता विद्यार्थ्यांना घोकमपट्टी करुन परीक्षा देता येणार नाही, CBSE कडून परीक्षा पद्धतीत बदल
- FYJC Admission : दहावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
- NEET 2022: ...ही तर NEET PG परीक्षार्थींची उघड लूट; FAIMA चा गंभीर आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI