![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जारी, येथे पाहू शकता
MHT CET 2022 Exam Schedule : महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस 2022 (Maharashtra CET) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सीईटी परीक्षा 2022 चं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
![MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जारी, येथे पाहू शकता maharashtra cet exam 2022 revised exam schedule and hall ticket released check at cetcell mahacet org MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जारी, येथे पाहू शकता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/ee2f527edfeb91f9d7c932c23d87d42f_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra CET 2022 Revised Exam Schedule Released : MHT-CET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस 2022 (Maharashtra CET) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सीईटी परीक्षा 2022 चं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट जारी होण्याची तारीख आणि परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांबाबत अधिक माहिती cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार वेबसाईटवर जाऊन अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
सुधारित वेळापत्रक
महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकानुसार, 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. MHT CET PCM ग्रुपसाठीची परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट आणि PCB ग्रुप परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात येईल.
परीक्षेचं प्रवेशपत्र कधी उपलब्ध होईल.
अधिकृत अधिसुचनेनुसार, परीक्षेसंदर्भातील प्रवेशपत्र जारी होण्याची तारखा देण्यात आल्या आहेत. पीसीएम ग्रुप (PCM Group) साठीचं हॉल टिकट 26 जुलै 2022 रोजी जारी करण्याता येईल. पीसीबी ग्रुप (PCB Group) परीक्षेसाठीचं हॉल टिकट 2 ऑगस्ट 2022 रोजी जारी करण्यात येईल.
याशिवाय मास्टर इन आर्किटेक्ट आणि महाराष्ट्र एचएमससीटी 2022 परीक्षेचं प्रवेशपत्र 23 जुलै 2022 रोजी उपलब्ध होईल. बी. प्लानिंग आणि एमसीए परीक्षेचं हॉल टिकट 25 जुलै 2022 रोजी जारी करण्यात येईल. बी.एचएमसीटी 2022 हॉल टिकट 11 ऑगस्टला आणि एमबीए/एमएमएस परीक्षेचं प्रवेशपत्र 13 ऑगस्टला उपलब्ध होईल.
पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया बदलणार
सध्या अभियांत्रिकी, कायदा आणि इतर तत्सम अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात. पण पुढील वर्षीपासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील बारावी आणि सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीला समान महत्त्व दिलं जाईल. प्रवेशाच्या वेळी दोन्ही गुणांना महत्त्व दिले जाईल. कोणत्याही विषयाबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)