फी न भरल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची हॉलतिकीट शाळेनी दिली नाहीत, ठाण्यातील घटना
Thane News : 10 विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं फी न भरल्यामुळे रोखून धरल्याचा प्रकार समोर आला आहे.
Thane News HSC News : बारावीची परीक्षा तोंडावर आली आहे, तरिही ठाण्यातील काल्हेर येथील नोबेल गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाने बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या दहा विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं फी न भरल्यामुळे रोखून धरल्याचा प्रकार समोर आला आहे. पालक विद्यार्थ्यांसोबत सकाळपासून शाळेत थांबून हॉल तिकिट मिळण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना विनवणी करत होते, मात्र मुख्यध्यापकांनी पालकांचे काही एक न ऐकता विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यास नकार दिला आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत धाव घेत मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट देण्याची विनंती केली. मात्र मुख्याध्यापकांनी मनसे पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे एकूण घेतले नाही. त्यांनतर मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर शाळेला हॉल तिकीट देण्यास सांगितले मात्र तरीही शाळा प्रशासनाने हॉल तिकीट न देण्यावर ठाम असल्याने मनसेचे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांसह शाळेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी,पालक त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांचेही काही एक न ऐकता विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखून ठेवले होते. जर शाळेच्या संचालक मंडळाने हॉल तिकीट देण्यास सांगितले तरच आम्ही हॉलतिकीट देऊ असा पवित्रा शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतला आहे तर विश्वजित मोहंती ( चेयरमन - भागवत प्रसाद गुरुकुल एज्युकेशन ट्रष्ट & नोबल एज्युकेशन फौंडेशन ) यांनी सांगितले की आम्ही कोणाच्या धमकीचे घाबरत नाही , ही लोक आपली राजकीय करिअर चमकवण्यासाठी असे करतात. आम्ही कर्ज काढून वेतन देतोय आणि पालक याकडे लक्ष देत नाही त्यामुळे जोपर्यंत फी देत नाही तोपर्यंत हॉल तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एवढेच नव्हे तर शिक्षण विस्तार अधिकारी संजय लक्ष्मण अस्वले व वैशाली सुनिल डोंगरे यांना घटनेची माहिती मिळताच शाळेत दाखल झाले परंतु शाळा प्रशासन यांच्याशी बोलण्यास तयार नव्हता अखेर शाळा प्रशासन या मुलांना भरल्याशिवाय हॉल तिकीट देणार नसल्याच्या निर्णयावर ठाम राहिला. केवळ फी भरली नाही म्हणून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे फक्त फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट किंवा त्यांच्या परीक्षेच्या अधिकारापासून वंचित करू शकत नाही असे असताना देखील जर कधी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले नाही तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनविसेनेचे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी यावेळी दिला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI