मोठी बातमी : यशश्री शिंदे हत्याप्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू, दाऊद शेखचं नाव कोरलं!
Yashshree Shinde Murder Case : यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू कोरल्याचं समोर आलं असून पोलिस आता टॅटू आर्टिस्टच्या शोधात आहेत.
नवी मुंबई : उरण हत्याकांडामध्ये (Uran Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशश्री शिंदेंच्या (Yashshree Shinde) शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या (Dawood Sheikh) नावाने यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. आता पोलिस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीने काढण्यात आले होते की जबरदस्तीने याचा शोध घेणार आहेत.
उरणमधील यशश्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं त्याच्या जबाबातून उघड झालं. आता यामध्ये टॅटू प्रकरणाची अपडेट आली आहे.
टॅटू काढताना दाऊद शेख उपस्थित होता
पोलीस सूत्रांनी सांगितले की, पोस्टमॉर्टमच्या दरम्यान मृत यशश्री शिंदे हिच्या शरीरावर दोन टॅटू दिसत होते. मृत यशश्री शिंदे हिच्या अंगावर दोन टॅटू सापडले असून त्यावर तिने आरोपी दाऊद शेखचे नाव कोरलं असल्याचं स्पष्ट झालंय. मृताने यशश्रीच्या अंगावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढला होता आणि हा टॅटू काढताना दाऊद शेखही उपस्थित होता असेही सूत्रांनी सांगितले.
दाऊद शेखने यशश्रीला टॅटू काढण्यास भाग पाडले का? तिच्या संमतीने हे केले गेले का? या प्रश्नांचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिस या टॅटू आर्टिस्टचा शोध घेत असून त्याचा जबाब नोंदवणार आहेत जेणेकरून टॅटूशी संबंधित माहितीची पडताळणी करता येईल.
यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात उरण पोलिसांना खालील मुद्द्यांच्या तपासासाठी दाऊद शेखची रिमांड हवी आहे,
- यशश्रीच्या शरिरावर जे रक्ताचे डाग आणि खुणा सापडल्या आहेत त्यांच्याशी दाऊदचा डीएनए तपासणं आवश्यक आहे.
- 2019 मधील पॉक्सो केस प्रकरणाचा सूड घेणं हाच एक हेतू यशश्रीच्या हत्येमागे होता, की दाऊदचा अन्य काही हेतू होता? याचाही तपास सुरू आहे.
- दाऊदनं इतक्या क्रूरतेनं केलेल्या या हत्येचं कारण काय? अद्याप त्याच्या चौकशीतून नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
- हत्येसाठी वापरलेलं हत्यार अद्याप सापडलेलं नाही. त्याचा शोध सुरू आहे.
- यशश्रीचा मोबाईल दाऊदनं कुठे फेकला?, त्याचं काय केलं?, याचा शोध घेणं गरजेचं आहे.
ही बातमी वाचा: