एक्स्प्लोर

Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली

Dhananjay Munde & Pankaja Munde: प्रवीण महाजनांच्या पत्नीचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप.

छत्रपती संभाजीनगर: दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि  कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी केला. प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जबरदस्तीने घेतली असल्याच त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन यांनी सांगितले

धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. 

सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी भाजपचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे बंधू होते. यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर  प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते. ते 2021 साली पॅरोलवर सुटून बाहेर आले असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ते जवळपास अडीच महिने कोमात होते. यानंतर ठाण्यातील एका रुग्णालयात प्रवीण महाजन यांचे निधन झाले होते. 

VIDEO: सारंगी महाजन यांचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर गंंभीर आरोप

आणखी वाचा

'तो' राक्षस, माझी उमेदवारी अवैध ठरवली, तुझा पराभव ठरलेला आहे; करुणा शर्मा ढसाढसा रडल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget