एक्स्प्लोर
Advertisement
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांना वेबसाईट बनवून देणाऱ्याला अटक, माटुंगा पोलिसांची कारवाई
Cyber Crime : बनावट संकेतस्थळे बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना संकेतस्थळ बनवून देणाऱ्या पुण्याच्या एका वेब डिझायनरला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे.
Cyber Crime : सध्या बनावट संकेतस्थळे बनवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे अनेक गुन्हे समोर येत असतात. पण या सायबर गुन्हेगारांना तांत्रिक पद्धतीने मदत करणारे अनेकदा पोलिसांच्या हाती लागत नाही. पण माटुंगा पोलिसांनी सायबर गुन्हे करणाऱ्यांना संकेतस्थळ बनवून देणाऱ्या पुण्याच्या एका वेब डिझायनरला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या वेब डेव्हलपरचं नाव सुग्रीव यादव असं असून त्याने बिहारमधील एका सायबर फ्रॉड करणाऱ्याला सहा संकेतस्थळ बनवून दिली होती. ज्याच्या द्वारे बिहारमधील आरोपीने अनेकांची फसवणूक केली होती. त्याने दादर येथील एका सीएची फसवणूक केली. ज्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान सर्व पर्दाफाश केला.
दादर पूर्वेकडे राहणारे सदाशिव शेट्टी हे सीए असून त्यांना नवीन इलेक्ट्रिक दुचाकीची एजन्सी सुरू करायची होती. त्यासाठी ते गुगलवर रिवोल्ट बाईक वंâपनीची एजन्सी शोधत असताना त्यांना इलेक्टिकबाईक्स डिलर्स डॉट इन हे संकेतस्थळ दिसले. त्या संकेतस्थळावर विचारलेली सर्व माहिती शेट्टी यांनी तेथे भरली. त्यानंतर एका अज्ञात इसमाने शेट्टींना संपर्क साधला. तुमची माहिती कंपनीकडे आली असून तुम्हाला एजन्सी मिळवून देऊ असे सांगत त्या व्यक्तीने शेट्टी यांच्याकडून तीन लाख 40 हजारची रक्कम उकळली. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल नंबर बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच शेट्टी यांनी माटुंगा पोलिसात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक राजाभाऊ गरड तसेच संतोष पवार, मंगेश जराड या पथकाने तपास सुरू केला.
मोठ्या शिताफीने पोलिसांकडून गुन्हेगाराला अटक
शेट्टी यांनी ज्या संकेतस्थळावर माहिती भरली, तसेच ज्या खात्यावर पैसे पाठवले त्याचा बारकाईने अभ्यास केला असता ते संकेतस्थळ पुण्यातील सुग्रीव यादव (36) याने बनविली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पुण्यात जाऊन यादवला अटक केली. यादव हा वेब डिझायनर असून तो सध्या 20 ते 25 प्रोजेक्टवर काम करत होता. त्याने बिहारमधील भामट्याच्या मदतीने इलेक्टिकबाईक्स डिलर्स डॉट इन हि बोगस वेबसाईड बनवली होती. त्याने विविध कंपन्यांच्या नावाने आणखी संकेतस्थळे बनविले असल्याची शक्यता असून माटुंगा पोलीस तपास करीत आहेत. बिहारमधील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नागरिकांना फसवूण पैसे मिळाल्यानंतर तो आरोपी यादवला त्याचे कमिशन देत होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- कल्याण रेल्वे यार्डात मजुरावर हल्ला करुन लुटीचा प्रयत्न, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- Raj thackeray video : अमरावतीसारखा प्रयत्न महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही, राज ठाकरे यांचा इशारा
- पिंपरीत भरदिवसा गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू, घटना CCTVत कैदॉ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement