पिंपरीत भरदिवसा गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू, घटना CCTVत कैद
तीन अज्ञातांनी पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळाबीरात योगेश जगताप यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळाबीरात योगेश जगताप यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणारे अज्ञात हे दुचाकीवरून आले होते. पिंपळेगुरवमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, ही सर्घ घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा अंदाज सांगवी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तीन अज्ञात दुचाकीवरून आले होते. त्यांनी केलेल्या गोळाबारात तीन पैकी दोन गोळ्या योगेश जगताप यांच्या छातीत लागल्या, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. योगेश जगताप हे सकाळी काटेपुरम चौकात आले असताना अचानक त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार होताना जगताप पळत सुटले, त्यांच्यात आणि गोळीबार करणाऱ्या अज्ञातांमध्ये झटापट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
दुचाकीही पळवली
भरदिवसा गोळीबार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप गोळीबाराचे कारण काय ते समजू शकलेले नाही. दरम्यान, पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. पिंपळे गुरव येथील काटेपुरम हा मुख्य चौक आहे. तिथे नेहमी नागरिकांची वर्दळ असते. जेव्हा हा गोळीबार झाला त्यावेळी अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. दोघांनी केलेल्या गोळीबारात नागरिक देखील जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. योगेश जगताप यांच्यावर गोळीबार करताच आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले.
गोळीबार करून आरोपी दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान, ते भोसरी - नाशिक रस्त्याच्या दिशेने निघाले होते. त्यांनी पळवलेल्या दुचाकीत पेट्रोल नसल्याने ते पेट्रोल भरण्यास गेले तिथे त्यांच्या दुचाकीला डॅश लागला, मग त्यांच्या हातातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल पडल. त्यांनी पिस्तुल त्याच ठिकाणी सोडून पळ काढला आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
महत्त्वाच्या बातम्या :