वाल्मिक कराडला दोषमुक्त का करत नाही? बीड विशेष मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण, 'संतोष देशमुख प्रकरणात...
Beed Crime: वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. या अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत.

Beed crime: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचे (Walmik Karad) एका मागोमाग एक कारनामे समोर आले . दरम्यान वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं असा अर्ज केला होता .तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण नोंदवलंय . त्यामुळे आता वाल्मीक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे . (Santosh Deshmukh Case)
विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदविले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. या अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत. वाल्मिक कराडला दोष मुक्त का केले जात नाही? याबाबत हे निरीक्षण नोंदवले गेले आहे. वाल्मीक कराडला दोष मुक्त केला जात नाही याचं कारण सांगताना न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली .
- वाल्मिक कराड टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून हत्या केल्याचं समोर आले आहे .
- वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
- आवादा एनर्जी प्रकल्प चालकाला धमक्या देणे. त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं न्यायालयाचे म्हणणे आहे.
वाल्मिक कराडचे वकील हायकोर्टात दाद मागणार
22 जुलै रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर कराडच्या वकिलाने म्हणणे मांडले होते. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करून कराडच्या दोष मुक्ती अर्जाला कडाडून विरोध केला होता. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृृृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुत्रधार वाल्मिक कराड जेलमधून ॲक्टिव्ह असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Death Case) यांच्या हत्या प्रकरणात (22 जुलै) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा (Walmik Karad) दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. तसेच आता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
























