Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या, चार जणांना अटक
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील एसएसटी कॉलेजसमोर असलेल्या सद्गुरु वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे स्वप्नील कानडेची धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली
ठाणे : उल्हासनगरमध्ये( Crime News) गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही. पूर्ववैमनस्यातून उल्हासनगरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. स्वप्नील कानडे असे हत्या करण्यात तरूणाचे नाव आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी चार आरोपीनां अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तर या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
स्वप्निल कानडे हा तरुण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, रॉबरी, मारामारी अशा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.स्वप्निल याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. रविवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील एसएसटी कॉलेजसमोर असलेल्या सद्गुरु वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे स्वप्नील कानडेची धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन व जागेचा पंचनामा करून स्वप्निलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
सापळा रचून आरोपींना अटक
पोलिसांनी राम यादव, रोशन वाघ, कुणाल बोडदे उर्फ कुबड्या आणि तुषार गोडांबे या चार आरोपींना विविध ठिकाणी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
कार पार्किंगच्या वादातून राडा! चालकासह तिघांना रॉडने बेदम मारहाण,
भर रस्त्यावर कार पार्किंगच्या (Car Parking) वादातून दोघा मायलेकांनी कार पार्किंग करणाऱ्या चालकासह तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील चक्कीनाका परिसरात कार घेऊन आला होता. त्यावेळी त्याने याच रोडवर असलेल्या एका खाजगी हॉस्पिटल समोरच कार पार्किग केली होती. मात्र, त्या ठिकाणी कार पार्किंगला आरोपी ऋषीने विरोध करत वाद घातला. त्यानंतर शिविगाळ करत असताना आरोपीच्या आईने मुलाच्या हातात लोखंडी रॉड लावून देऊन दोघांनी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या दोघांना मारहाण करण्यात सुरुवात केली. तर या घटनेमुळे भर रस्त्यात एकच खळबळ उडाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये पळापळ झाली होती.
हे ही वाचा :
उधारीवर किराणा दिला नाही म्हणून दगडफेक, दुकानचालक माय लेकीसह वाचवण्यासाठी आलेल्या दिराला मारहाण