उधारीवर किराणा दिला नाही म्हणून दगडफेक, दुकानचालक माय लेकीसह वाचवण्यासाठी आलेल्या दिराला मारहाण
किराणा दुकानातील माल उधार देण्यास नकार दिला याचाच राग तरुणांनी मनात धरत दुकानाची तोडफोड करत दुकान चालकांना बेदम मारहाण करत दुकानात केली.
कल्याण: कल्याणमध्ये (Kalyan Crime News) तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. कल्याणमधील अडवली ढोकळी परिसरात मोदी किराणा व जनरल स्टोअर्स आहे. किराणा दुकानातील माल उधार देण्यास नकार दिला याचाच राग तरुणांनी मनात धरत दुकानाची तोडफोड करत दुकान चालकांना बेदम मारहाण करत दुकानात केली. मारहाण करून शांत बसले नाही तर दगडफेक देखील केली. संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी (Dombivli Manpada Police Station) गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अडवली ढोकळीतील मोदी किराणा दुकानात गौतम उर्फ भोला सिंग ,अभिषेक गुप्ता, गोलू व अशु नावाचे चार तरुण या किराणा दुकानात किराणा सामान घेण्यासाठी आले. मात्र सामान घेण्यासाठी यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी सामान उधारीवर मागण्यास सुरुवात केली. या वेळेला दुकानात असलेल्या महिला कुसुम महेश सिंग यांनी उधारीवर सामान देण्यास नकार दिला. याचाच राग या तरुणांना आल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. दुकानात सुरू असलेला वाद ऐकून घरात असलेल्या महिलेची मुलगी व तिचा दीर दुकानावर आले व त्यांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र संतप्त तरुणांनी या तिघांना मारहाण सुरू केली. इतकेच नाही तर दुकानावर दगडफेक करत दुकान फोडून टाकलं. महिला व तिच्या मुली आणि दिरावर ही दगडफेक करण्यास सुरुवात केली अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. अर्धा तासानंतर कसाबसा जीव वाचवत या महिलांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे.
तरूणांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी चारही तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू केला आहे. किराणा माल उधार का दिला नाही, म्हणून आरोपींनी जबर मारहाण केली. आरोपींच्या हल्ल्यात तक्रारदार हे जखमी झाले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र मारहाण आणि दगडफेकीच्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
हे ही वाचा :